Ravindra Dhangekar On Excise Department | राज्य उत्पादन शुल्क विभागात धंगेकरांनी हप्तेखोरांची यादीच वाचून दाखवत सुनावले खडेबोल (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar On Excise Department | कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत (Kalyani Nagar Accident) . या अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने पैसे खाऊन बदलल्यामुळे पुणे पोलिसांनी (Pune Police) ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे (Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest ). या अपघात प्रकरणात संबंधित अल्पवयीन मुलाला काही तासात जामीन मिळाल्यांनतर विविध स्तरातून रोष निर्माण झाला होता.

तसेच आता या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर अगरवाल कुटुंबाच्या विरोधात आणखी एक तक्रारदार समोर आला आहे.(Ravindra Dhangekar On Excise Department)

पुणे अपघात प्रकरणात कारवाईस होत असलेल्या दिरंगाईमुळे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत पोलिसांनीच पैसे खाऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

आज काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी पुण्यातील
उत्पादन शुल्क विभागाच्या (Pune Excise Department) कार्यालयावर धडक देत विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी धंगेकरांनी ” तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही पापं करताय, तुम्हाला लय समजतं का, तुम्ही दर महिन्याला ७० ते ८० लाख
हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे. तुमचे कोण कोण लोक पैसे आणून देता, याची माहिती माझ्याकडे आहे.
तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का, तुम्ही पुणे उदध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही?, ” अशा एकापाठोपाठ
प्रश्नांची सरबत्ती करत विभागातील अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

तसेच कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे तुमच्या आशीवार्दाने हप्ते
घेतात. याचा जाब विचारण्यासाठी आलो असल्याचे धंगेकर यांनी सांगितले. धंगेकरांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे विविध यंत्रणेचे अधिकारी आता आणखी जोमाने कारवाई करतील असे बोलले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरने 3 लाख घेतले

Ravindra Dhangekar On Sassoon Doctors | पोर्शे कार अपघात प्रकणात ससूनच्या डॉक्टरांना अटक, धंगेकर म्हणाले – ‘त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल’

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेऊन कचऱ्यात टाकल्याची पोलीस आयुक्तांची माहिती (Video)

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग नंतर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती (Video)