Raw Turmeric Benefits | कच्च्या हळदीचे आरोग्याशी संबंधीत अनेक फायदे, करून पहा!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Raw Turmeric Benefits | भारतीय खाद्यपदार्थांमध्ये हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. डाळ, भाजी, सालन इत्यादींमध्ये याचा वापर होतो. हळद (Turmeric) जेवणाची चव वाढवते, तसेच डिशचा रंगही वाढवते. हळद एक असा मसाला आहे ज्याचा सर्वाधिक वापर केला जातो, पण तुम्हाला माहित आहे का कच्ची हळद आपल्या शरीराला जास्त फायदे (Raw Turmeric Benefits) देते?

 

कच्च्या हळदीचे फायदे (Benefits Of Raw Turmeric)

1. पचन सुधारते (Improves Digestion)
कच्च्या हळदीचे नियमित सेवन केल्याने पित्त निर्मिती सुधारते आणि त्यामुळे पचनक्रिया (Digestion) सुधारते. इरिटेबल बोवेल सिंड्रोमने (Irritable Bowel Syndrome) ग्रस्त असलेले लोक आराम मिळवण्यासाठी त्यांच्या रोजच्या आहारात कच्च्या हळदीचा (Raw Turmeric) समावेश करू शकतात.

 

2. औषधी गुणधर्मांनी समृद्ध (Rich In Medicinal Properties)
कच्ची हळद औषधी गुणधर्मांनी (Medicinal Properties) समृद्ध आहे. त्यात कर्क्यूमिनची (Curcumin) उच्च सांद्रता आहे, जे एक संयुग आहे आणि आपल्या अँटीसेफ्टिक गुणधर्मांसाठी (Antiseptic Properties) ओळखले जाते. हे सर्दी (Cold), खोकला (Cough), त्वचा संसर्ग (Skin Infection), मूत्रमार्गात संसर्ग (Urinary Tract Infection) आणि फॅटी लिव्हर (Fatty Liver) रोगावर उपचार करण्यास मदत करते.

3. ब्लड शुगर कंट्रोल करते (Regulates Blood Sugar)
मधुमेह (Diabetes) असलेल्या लोकांसाठी कच्च्या हळदीचे सेवन (Raw Turmeric Intake) करणे आवश्यक आहे. हे केवळ ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रित करत नाही तर इन्सुलिन प्रतिरोधक समस्या ठिक करण्यात देखील मदत करू शकते (Raw Turmeric Benefits).

 

4. रक्त शुद्ध करण्यासाठी (Blood Purifiers)
कच्च्या हळदीमध्ये काही आश्चर्यकारक अँटिऑक्सिडंट गुणधर्म (Antioxidant Properties) असतात जे तुम्हाला पेशींच्या नुकसानीपासून वाचवू शकतात. ती रक्तप्रवाहातील टॉक्सीन (Toxin) हटवून नैसर्गिक पद्धतीने रक्त शुद्ध करण्याचे काम करते.

 

5. वेदना कमी करण्यासाठी (To Reduce Pain)
कच्ची हळद वेदना, विशेषतः सांधेदुखी (Joint Pain) संबंधीत वेदनांवर त्वरित काम करते.
कच्ची हळद अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्मांनी (Anti-inflammatory Properties) युक्त एक नैसर्गिक वेदना शामक आहे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

#हेल्थ टिप्स #हेल्थी लाइफस्टाइल #कच्ची हळद #कच्च्या हळदीचे फायदे #पचनासाठी कच्ची हळद #गुणकारी कच्ची हळद #Health and Medicine #lifestyle #health #health tips #healthy lifestyle #raw turmeric benefits #raw turmeric for digestion

 

Web Title :- Raw Turmeric Benefits | know 5 amazing benefits of raw turmeric for health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Cyber Crime | क्रिप्टो करन्सी गुंतवणुक योजनेत अनेक पुणेकरांची फसवणूक; सायबर पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून केली अटक

 

Sambharaje Chhatrapati | संभाराजेंची आता ठाकरे सरकारला साथ?; ‘या’ मंत्र्याने केलं सूचक वक्तव्य

 

Pune Crime | कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील 64 वर्षाच्या आरोपीला जामीन मंजूर