रेमंड समूहातील पिता पुत्राचा वाद चव्हाट्यावर ; वडिलांच्या आत्मचरित्रावर मुलाची आडकाठी 

वृत्तसंस्था : प्रसिद्ध रेमंड समूहातील पिता पुत्राचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. रेमंड कंपनीला उत्तुंग शिखरावर पोहोचवणाऱ्या विजयपत सिंघानिया यांना त्यांच्याच मुलाने कंपनीतून हटवलंय. विजयपत सिंघानिया यांना ऑटोबायोग्राफी लिहायची आहे. पण त्यांचा मुलगा रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संस्थापक गौतम सिंघानिया यांचा त्याला विरोध आहे.

या ऑटोबायोग्राफी नंतर गौतम सिंघानिया यांच्या प्रतिमाला धक्का लागेल असे गौतम यांना वाटते आहे. यापूर्वी ऑटोबायोग्राफी रोखावी यासाठी आणि त्यात काय प्रकाशीत होतंय याबाबत माहिती मिळावी यासाठी गौतम सिंघानिया यांनी मुंबईतील कोर्टात याचिकाही दाखल केली होती. पण न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

रेमंड कंपनीला उत्तुंग शिखरावर पोहोचवणाऱ्या विजयपत सिंघानिया यांना त्यांच्याच मुलाने कंपनीतून हटवलंय. त्यांना एका पत्राद्वारे तुम्ही आता रेमंड समूहाच्या संचालक मंडळाचे सदस्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे. निवृत्त अध्यक्ष पदावरुनही गौतमने त्यांना हटवलंय. संचालक मंडळाच्या बैठकीला बोलावलं जात नाही अशी विजयपत सिंघानिया यांनी वारंवार तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना निवृत्त अध्यक्ष पदावरुनही हटवण्यात आलं.
सिंघानिया पिता पुत्राचा वाद चव्हाट्यावर 
वर्ष २०१५ मध्ये विजयपत यांनी रेमंड समूहाचे कंट्रोलिंग स्टेक (५० टक्क्यांहून अधिक शेअर) मुलगा गौतमच्या नावावर केले होते. वर्ष २००७ मध्ये झालेल्या करारानुसार विजयपत यांना मुंबईच्या मालाबार हिल परिसरात ३६ महलच्या जेके हाउसमध्ये एक अपार्टमेंट मिळणार होतं. याची किंमत बाजारभावापेक्षा बरीच कमी ठेवण्यात आली होती.

नंतर कंपनी गौतम सिंघानियांच्या हाती गेली आणि त्यांनी इतकी बहुमुल्य संपत्ती विकण्यास परवानगी नाकारली. यामुळे दोघांमध्ये वाद वाढला. ज्या मुलाला माझा सर्व व्यवसाय दिला त्यानेच मला घरातून बाहेर काढलं असा आरोप नंतर विजयपत यांनी केला. आता आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी विजयपत सिंघानिया कायदेशीर लढाई देत आहेत