ICC World Cup 2019 : ‘या’ ट्विटने संपवली रायडूची ‘कारकीर्द’ ? ; नाईलाजाने घ्यावी लागली निवृत्ती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडू याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने दिली आहे. BCCI अधिकाऱ्यांनी रायडू ने निवृत्तीसाठी पत्र लिहून विचारणा केल्याचे सांगितले.

सध्या चालू असलेल्या वर्ल्ड कप मध्ये खेळणाऱ्या भारतीय संघामध्ये निवड न झाल्यामुळे रायडू अनेक दिवसांपासून निराश होता. संघामध्ये स्थान नाकारल्यानंतर रायडूने या निर्णयाची थट्टा करत एक ट्विट केले होते. त्याच्या या ट्विट मुळेच त्याची कारकीर्द संपुष्टात असे बोलले जात आहे. कारण, वर्ल्ड कप साठी त्याला स्टॅन्ड बाय वर ठेवले होते. तरी देखील त्याला संघात सामील केलेले नाही.

काय होते रायडूचे ट्विट :

वर्ल्ड कप सुरु होण्याआधी रायडूने केलेल्या ट्विट मध्ये त्याने म्हटले होते की, ‘३० मे पासून सुरु होणाऱ्या टूर्नामेंट मधील सामने पाहण्यासाठी त्याने ३D चष्म्याची ऑर्डर दिली असून तो त्याद्वारे सामन्याचा आनंद लुटेल.’ या ट्विट नंतर बीसीसीआय ने त्याच्यावर कोणतीही अधिकृत कारवाई केली नसून त्याला दंड करण्याची देखील योजना नसल्याचे बीसीसीआय ने स्पष्ट केले आहे.

रायडूच्या संघातील पुनरागमनाची शक्यता कशी संपुष्टात आली :

विश्वचषक सुरु होण्याआधी भारतीय संघाला ४ नंबर चा फलंदाज मिळत नव्हता. संघात कोणाला संधी दिली जावी. या संदर्भात विजय शंकर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव आणि अंबति रायडू यांच्या नावाची चर्चा होती. अंतिम १५ जणांच्या संघात अंबाती रायडूच्या जागेवर विजय शंकर ला प्राधान्य दिले गेले. बोर्डाच्या या निर्णयावर रायडूने चिडून नाराजी व्यक्त करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर त्याने निवडसमितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांच्या ‘विजय शंकर संघाला थ्री-डाइमेंशन (३D) दृष्टिकोन देईल.’ या वक्तव्याची खिल्ली आपल्या ट्विटद्वारे उडवली होती.

यावेळी रायडू राखीव खेळाडूंमध्ये होता. मात्र शिखर धवन आणि विजय शंकर जखमी झाल्यानंतर देखील त्याला संघात जागा दिली नाही. त्याच्याऐवजी ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल यांना संधी दिली गेली.

या सर्व घडामोडी पाहिल्यास हे स्पष्ट होते की, रायडूला त्याचे ट्विट चांगलेच महाग पडले असून त्यामुळेच त्याला संघात जागा नाकारली गेली आहे. यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव