RBI Action On Banks In Maharashtra | RBI ची मोठी कारवाई, SBI नंतर महाराष्ट्रातील ‘या’ 4 सहकारी बँकांना लावला दंड

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) काही दिवसांपूर्वी एसबीआयवर (SBI) दंड लावल्यानंतर आता पुन्हा पाच सहकारी बँकांना पेनल्टी (RBI Imposes Penalty) लावली आहे. हा दंड नियमांचे पालन न केल्याने लावण्यात आला आहे. यावेळी ज्या सहकारी बँकांना पेनल्टी लावली आहे त्यामध्ये एसबीपीपी सहकारी बँक लिमिटेड (SBPP Cooperative Bank Limited), द सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड (The Sahyadri Cooperative Bank Limited), रहिमतपुर सहकारी बँक लिमिटेड (Rahimatpur Cooperative Bank Limited), द गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (The Gadhinglaj Urban Co-operative Bank Limited) आणि द कल्याण जनता सहकारी बँक लिमिटेड (The Kalyan Janata Sahakari Bank Limited) यांचा समावेश आहे. काही त्रुटी आढळल्यास आरबीआयकडून वेळोवेळी अशाप्रकारची कारवाई होत असते, याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होत नाही.

रिझर्व्ह बँकेने ‘ठेवींवर व्याजदर’च्या आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याने एसबीपीपी सहकारी बँक लिमिटेड, पारदी, गुजरात या बँकेला १३ लाख रुपयांचा दंड लावला. सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड, मुंबई या बँकेला ६ लाख रुपयांचा दंड लावला आहे. बँकेला ही पेनल्टी केवायसी आणि जमा खात्यांची देखरेखीच्या नियमांचे पालन न केल्याने लावली आहे. सह्याद्री सहकारी बँकेने ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता कोषात पात्रता रक्कम भरली नव्हती. याशिवाय एसएएफ अंतर्गत जारी निर्देशांचे उल्लंघन करत एसबीआयकडून देण्यात आलेल्या व्याजदारापेक्षा जास्त व्याज देऊ केले होते. बँकेकडून खातेधारकांच्या केवायसीच्या अपडेशनसाठी कोणतीही सिस्टम बनवण्यात आली नव्हती.

केवायसी नियमांचे पालन न केल्याने ३ लाख दंड
केंद्रीय बँकेने रहीमतपुर सहकारी बँक लिमिटेड, रहीमतपुर, जिल्हा -सातारा या बँकेला १ लाख रुपयांचा दंड लावला आहे. ही पेनल्टी रिझर्व्ह बँकेकडून इन-ऑपरेटिव्ह बँक अकाउंटचे पुनरावलोकन न केल्याने लावली आहे.

द गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गडहिंग्लजवर सुद्धा केवायसी मानकांचे पालन न केल्याने तीन लाखांचा
दंड लावला आहे. रिजर्व्ह बँकने ठेवींवर व्याजदर आणि ठेवी खात्यांची देखभाल बाबत आरबीआयच्या आदेशांचे पालन
न केल्याने द कल्याण जनता सहकारी बँक लिमिटेड, कल्याण, महाराष्ट्र या बँकेला ४.५० लाख रुपयांचा दंड लावला आहे.

एसबीआला सुद्धा लावला दंड
तत्पूर्वी, आरबीआयने काही दिवसांपूर्वी एसबीआय आणि इंडियन बँकेला (Indian Bank) कोट्यवधी रुपयांचा दंड
लावला होता. यानंतर रिझर्व्ह बँकेने तीन अन्य सहकारी बँकांना दंड लावला होता. यामध्ये सारस्वत सहकारी बँक लिमिटेड,
बेसिन कॅथलिक सहकारी बँक लिमिटेड आणि राजकोट नागरिक सहकारी बँक लिमिटेड यांचा समावेश होता.
एसबीआयवर १.३ कोटी रुपये, इंडियन बँकेवर १.६२ कोटी रुपये आणि पंजाब अ‍ॅन्ड सिंध बँकेवर १ कोटी रुपयांचा दंड लावला होता.

केंद्रीय बँकेकडून वेळोवेळी बँकांवर नियम पालनात त्रुटी आढळल्यास दंड लावला जातो.
परंतु, याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम खातेधारकांवर होत नाही.
बँकांकडून खातेधारकांच्या रोख रक्कम काढणे अथवा जमा करण्यावर कोणताही प्रतिबंध लावला जात नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | उपचारासाठी भारतात बोलावून वेश्या व्यवसायात ढकलले, गुन्हे शाखेकडून बांगलादेशी तरुणीची सुटका