खुशखबर ! ATM द्वारे पैसे काढल्यानंतर लागणारा ‘चार्ज’ होणार बंद ; RBI गव्हर्नरचे संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर आता आरबीआय लवकरच ग्राहकांना आणखी एक खुशखबर देण्याचाही विचार करत असल्याचे समजत आहे. पैसे काढल्यानंतर एटीएमवर लागणारा चार्ज आता बंद करण्याचा विचारात आरबीआय असल्याचे समजत आहे. लवकरच यासंबंधी एक समिती स्थापन करून त्यांना याबाबतीत अभ्यास करायला सांगण्यात येणार आहे. या समितीचे नेतृत्व IBA चे CEO करतील. हि समिती आपल्या पहिल्या बैठकीनंतर दोन महिन्यात आपला अहवाल आरबीआयला सादर करतील.

याविषयी अधिक बोलताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास म्हणाले कि, एटीएमचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर याच्या वापरासंबंधी घेण्यात येणारे चार्ज रद्द करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. यामुळेच याच्यावर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. एटीएमवर घेण्यात येणारे चार्ज आणि बाकी गोष्टींवर अभ्यास करणे आणि याचा अहवाल आरबीआयला सोपवणे हे या समितीचे काम असणार आहे.

दरम्यान, याआधी आरबीआयने रेपो रेट ६ % वरून ५.७५% करण्याचा निर्णय सकाळी घेतला असताना आता एटीएम संबंधी निर्णय घेऊन नागरिकांना दुहेरी आनंद देण्याच्या तयारीत आहे.