RBI ची नवीन योजना, जाणून घ्या कशाप्रकारे तुम्ही बँक आणि दुसर्‍या संस्थांविरूद्ध नोंदवू शकता तक्रार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलिकडेच इंटीग्रेटेड लोकपाल योजना (Integrated Ombudsman Scheme) सुरू केली आहे. ही एक प्रकारे ‘एक देश-एक लोकपाल’ सिस्टम आहे, जिचा हेतू बँका, नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीज (NBFC) आणि पेमेंट सर्व्हिस ऑपरेटर्सविरूद्ध ग्राहकांकडून येणार्‍या तक्रारी निकाली काढण्याची प्रणाली मजबूत करण्याचा आहे. (RBI)

 

सर्वत्र टेक्नॉलॉजीचे फाऊंडर, व्हाईस-चेयरमन आणि MD मंदार अगाशे म्हणतात, नवनवीन प्रकारच्या पेमेंट सिस्टम आणि टेक्नॉलॉजीमुळे
‘एक देश-एक लोकपाल’ सिस्टम यूजर्ससाठी खुप महत्वाची भूमिका पार पाडतील.
ग्राहक आता कोणत्याही बँक, पेमेंट सिस्टम विरूद्ध एकाच ठिकाणी तक्रार दाखल करू शकतील.
ती ट्रॅक करू शकतील आणि त्यावर फीडबॅक प्राप्त करतील.
यामुळे त्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होईल.
ग्राहक लोकपाल सिस्टममध्ये कशा प्रकारे तक्रार दाखल करू शकतात, ही प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप जाणून घेवूयात…

 

कुठे करायची तक्रार दाखल जाणून घ्या

 

ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी वेबसाइट https://cms.rbi.org.in वर जा. किंवा [email protected] वर ईमेलद्वारे किंवा टोल फ्री नंबर 14448 वर कॉल करून सुद्धा तक्रार नोंदवू शकता.
याशिवाय फॉर्म भरून आणि चंडीगढमध्ये आरबीआयद्वारे स्थापन केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्राला पाठवून सुद्धा तक्रार पाठवू शकता. (RBI)

 

तक्रारीची प्रत अपलोड करावी लागेल

 

RBI च्या CMS वेबसाइटवर, तक्रार नोंदवण्यासाठी मोबाइल नंबर ओटीसह व्हेरिफाय करावा लागेल.
नंतर ऑनलाइन फॉर्मवर व्यक्तीगत माहिती भरा आणि त्या संस्थेची निवड करा जिच्याविरूद्ध तक्रार दाखल केली जात आहे.
त्या तारखेसह तक्रारीची माहिती द्या, ज्या तारखेला तुम्ही पहिल्यांदा त्या संस्थेविरूद्ध तक्रार दाखल केली होती, नंतर तक्रारीची प्रत अपलोड करा.

 

द्यावी लागेल ही माहिती

 

  • तक्रार नोंदवण्यासाठी कार्ड नंबर/लोन/बँक अकाऊंटची माहित प्रदान करा. नंतर तक्रारीची वर्गवारी निवडा.
    उदाहरणार्थ, कर्ज आणि अ‍ॅडव्हान्स किंवा मोबाईल बँकिंग. ड्रॉप-डाऊन मेनूतून एक पर्याय निवडू शकता.

 

  • नंतर एक उपयुक्त सब-कॅटेगरीची निवड करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही सब-कॅटेगरी 1 मध्ये घेतलेल्या फीसंबंधी एक तक्रार निवडली असेल.
    तर ड्रॉप-डाऊनमध्ये मेनू, तुम्हाला तक्रारीचे कारणे निवडची गरज असेल, जसे की क्रेडिट कार्ड जारी इत्यादी.

 

  • तक्रारीची वास्तविक माहिती प्रदान करा. वादाची रक्कम आणि मागणी केलेल्या भरपाईचा (जर काही असेल) उल्लेख करा.
    तक्रारीची समरी पहा आणि नंतर ती सबमिट करा. आपल्याकडे रिकॉर्ड ठेवण्यासाठी तक्रारीची पीडीएफ कॉपी डाऊनलोड करा आणि सेव्ह करा. (RBI)

 

Web Title : RBI | rbi new integrated ombudsman scheme know how you can file a complaint against the bank reserve bank of india news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nagpur Crime | प्रियकराच्या नादात विवाहीतेनं स्वतःच्या हाताने भरल्या संसाराचा केला ‘सत्यानाश’, तरूणासाठी पतीला दिला ‘दगा’ अन्…

South Superstar Vijay | साऊथ सुपरस्टार विजयला बॉम्बनं घर उडवण्याची धमकी

WCL Recruitment 2021 | वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर इथे ‘या’ जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर