सांगवीत रियल इस्टेट एजंटवर खुनी हल्ला…

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन
सांगवी येथे एका रियल इस्टेट एजेंटला दगडाने डोक्यात आणि तोंडावर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नी रेणुका संदीप जगताप यांनी सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेत संदीप नारायण जगताप हे यात गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी रेणुका संदीप जगताप (वय:३९) आणि पती संदीप नारायण जगताप (वय:४२ रा.वेताळ महाराज सोसायटी जुनी सांगवी) ही घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चालत फिरण्यासाठी गेले होते.त्यावेळी ते शकुंतला शाळेसमोर आले असता अचानक अज्ञात व्यक्तीने जखमी संदीप वर दगडाने हल्ला केला यात त्याच्या डोक्यात आणि तोंडावर जखमा झाल्या आहेत. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप मात्र हल्ला करण्याचे कारण अस्पष्ट आहे. पुढील तपास सांगवी पोलिस करत आहे.