Real Estate Bank Loan | रिअल इस्टेट कर्जाच्या प्रमाणात विक्रमी वाढ; जुलैमध्ये 28 लाख करोड रुपयांवर पोहोचला आकडा

पोलीसनामा ऑनलाइन – Real Estate Bank Loan | प्रत्येक सामान्य माणसासाठी घर खरेदी करणे हे एक महत्त्वपूर्ण स्वप्न बनले आहे, हिच स्वप्नपूर्ती करण्यासाठी प्रत्येक बॅक खातेदारांला महत्त्वपूर्ण अर्थिक सहाय्य पुरवते. गृह कर्जाच्या (Home Loan) रूपाने वृत्तीय गरजा पूर्ण करत अनेकांनी घरांची खरेदी केली आहेत. भारतीय रिजर्व बॅंकेने (Reserve Bank of India) दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यामध्ये सर्वात जास्त गृह कर्ज देण्यात आले असून कर्जाची टक्केवारी खूप वाढली आहे. ही टक्केवारी 38 टक्कांनी वाढून कर्ज हे 28 लाख कोटी रुपयांचे झाले आहेत. यामध्ये गृहनिर्माण आणि व्यावसायिक रिअल इस्टेट (Commercial Real Estate) दोन्ही क्षेत्रांचा सर्वात समावेश आहे. आरबीआयकडून (RBI) रिअल इस्टेट क्षेत्रावरील कर्जाची आकडेवारी आणि मालमत्ता सल्लागारांकडून देण्यात आलेल्या या नवीन आकडेवारीने हे स्पष्ट झाले आहे की रिअल इस्टेट क्षेत्र (Real Estate Bank Loan) हे वेगाने वाढत आहे.

देशातील काही महत्त्वपूर्ण शहरांमध्ये झपाट्याने प्रगती होत असून नवनवीन उद्योग तयार होत आहेत. त्यामुळे काही मुंबई (Mumbai), हैदराबाद (Hyderabad), बैंगलोर (Bangalore) यांसाख्या शहरामध्ये स्थलांतरितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मोठे गृहनिर्माण प्रकल्प वाढले असल्याने गृहकर्ज घेण्याचे प्रमाण देखील वाढले आहेत. मागील काही महिन्यामध्ये रियल इस्टेंट क्षेत्र झपाट्याने वाढले असून बॅंकांचा देखील गृहकर्जासाठी जास्त प्रमाणात वापर केला जात आहे.

RBI च्या सेक्टरल डिप्लॉयमेंट ऑफ बँक क्रेडिटने (Sectoral Deployment of Bank Credit) दिलेल्या माहितीनुसार,
प्राथमिक क्षेत्रातील गृहनिर्माणासह रिअल इस्टेट क्षेत्रातील देण्यात आलेले कर्जे जुलैमध्ये वार्षिक 37.4 टक्क्यांनी
वाढून 24.28 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहेत. व्यावसायिक मालमत्तेवरील बँकांची थकबाकी 38.1 टक्क्यांनी वाढून 4.07 लाख कोटी रुपये झाली आहे. अॅनारॉकचे चेअरमन अनुज पुरी (Anarock Chairman Anuj Puri) यांनी सांगितले आहे की, रिअल इस्टेट क्षेत्रातील कर्जाची अशी मोठी मागणी ही या क्षेत्रामध्ये होणारी वाढ दाखवत आहे.

अॅनारॉकचे चेअरमन पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षी व्यापारी क्षेत्रावर कोरोनाच्या महामारीचा देखील परिणांम झाला होता.
साथीच्या रोगामुळे रोजचे जीवन संघर्षमय होत असल्यामुळे लोकांकडून घरांची मागणी कमी झाली होती.
त्याच वेळी, ऑफिस कर्मचाऱ्यांनी ऑफिसमधून काम करणे पूर्णपणे बंद केले होते आणि वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रीड मॉडेल
स्वीकारले होते. पण आता ही स्थिती सुधारल्यामुळे चांगल्या दर्जाची कर्जाची मागणी वाढली आहे.
अशा स्थितीत व्यावसायिक कार्यालयांची संख्या देखील वाढली आहे.

RBIच्या नव्या आकडेवारीनुसार, 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत देशात HPI वाढ वार्षिक आधारावर 5.1 टक्क्यांवर
पोहोचली आहे. या आधी तिमाहीत 4.6 टक्के तर वर्षभरापूर्वी 3.4 टक्के होती.
अशी मोठी वाढ झाली असून यावर अनुज पुरी म्हणाले की, “2022 मध्ये पहिल्या 7 शहरांमध्ये घरांची विक्री गेल्या
वर्षीच्या तुलनेत 63 टक्क्यांवर पोहोचली आहे. तसेच गृहकर्जाच्या व्याजदरात (Real Estate Bank Loan) सातत्याने
वाढ होऊनही मागणी कमी झालेली नाही.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Crime News | ‘ACP, DCP, CP कोणीही असो, माझ्या समोर येण्याची पोलिसांची ताकद नाही’, पत्रकार असल्याची बतावणी करून खंडणी मागणार्‍या एकनाथ अडसूळ विरूध्द गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ