भारतीय आयुर्विमा महामंडळात ८५८१ जागांसाठी मेगा भरती

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतीय आयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी या पदासाठी ८५८१ जागांसाठी मेगा भरती होणार असून भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जुन आहे.

कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा भारतीय विमा संस्थान, मुंबई येथील फेलोशिप मिळालेला विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतो. या पदासाठी उमेदवाराचे वय १ मे २०१९ रोजी २१ ते ३० वर्षे पूर्ण असावे. [SC/ST:०५ वर्षे सूट, OBC:०३ वर्षे सूट] देण्यात आली आहे. उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठेही नोकरी करावी लागेल. अर्ज करण्याची फी मराठा / ओबीसीसाठी रु. ६०० तर एससी / एसटीसाठी रु ५० एवढी आहे. हि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र दि. २९ जून २०१९ पासून मिळणार असून पूर्व परीक्षा दि. ६ आणि १३ जुलै २०१९ तर मुख्य परीक्षा १० ऑगस्ट २०१९ रोजी घेतली जाणार आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या खालीलप्रमाणे :
अ.क्र. क्षेत्र पद संख्या
१ सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) ५२५
२ ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ) ९२२
३ ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) ७०१
४ नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ) ११३०
५ नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) १०४२
६ साउथर्न झोनल ऑफिस (SZ) १२५७
७ साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ १२५१
८ वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ) १७५३

एकूण जागा ८५८१