मलालाच्या बायोपिकमध्ये काम करणार ‘ही’ अभिनेत्री, रियल लाइफमध्ये एकदम ‘ग्लॅमरस’ अन् ‘टकाटक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेली मलाला यूसुफजेईच्या ‘गुल मकई’ बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात रीम शेख मुख्य भूमिका साकारत आहे. हा रीमचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटानंतर तिने ‘तुझे है राब्ता’ शो देखील साईन केला होता, त्यानंतर ती खूप लोकप्रिय झाली.

https://www.instagram.com/p/B6DVjVcDg_m/

पाकिस्तानच्या स्वात वैलीमधून निघून फ्री शिक्षणासाठी वकिली करणार्‍या कार्यकर्त्या मलालाच्या ‘गुल मकई’ या बायोपिकच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमजद खान यांनी केले असून चित्रपटात अतुल कुलकर्णी आणि दिव्या दत्ता मलालाच्या पालकांची भूमिका साकारत आहेत. याशिवाय पंकज त्रिपाठीसुद्धा या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहेत.

https://www.instagram.com/p/B3ySCOWDOXR/

https://www.instagram.com/p/ByZS0QyjWxz/

रीम शेख हिने 2018 मध्ये हा चित्रपट साइन केला होता. पण हा चित्रपट रिलीज होण्यास वेळ लागला. आता हा चित्रपट 31 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. मलाला तालिबानच्या अत्याचार आणि भीतीविरूद्ध कशी उभी राहते हे देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. रीमने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तिने चित्रपट मलालाच्या वडिलांसोबत पाहिला होता. त्यांनाही चित्रपट खूप आवडला होता. मलाला जियाउद्दीन यूजीफजेई यांची मुलगी आहे.

https://www.instagram.com/p/Br2gZ9iFXTZ/

मलालाची कहाणी ही खास आहे कारण तिने जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटनेविरूद्ध बीबीसी उर्दू वेबसाइटवर ब्लॉग लिहिण्यास सुरवात केली. या ब्लॉगमध्ये मलाला पाकिस्तानच्या स्वात खो वैलीमध्ये होणाऱ्या अत्याचारांविषयी बोलत असे. ती गुल मकई नावाच्या फेक आयडीने हा ब्लॉग करत असे. यामुळे चित्रपटाचे नाव ‘गुल मकई’ असे ठेवले गेले आहे.

https://www.instagram.com/p/BmYfHUDH6KB/

चित्रपटाच्या ट्रेलरच्या एका भागामध्ये मलाला असेही म्हणते की, जर तालिबानमध्ये हत्यारांची ताकद असेल तर आपल्याकडे कलमची ताकद आहे आणि एक मुलगा, एक शिक्षक, एक पुस्तक आणि पेनवर जग बदलू शकते. पंकज त्रिपाठी, मुकेश ऋषी सारखे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 31 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/