मुंबईकरांनो सतर्क रहा ! मुंबईसह उपनगरात 48 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Regional Meteorological Center | मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून (Regional Meteorological Center) येत्या 48 तासासाठी मुंबईकरांना (Mumbaikar) सतर्कतेचा इशारा (Alert) देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात येत्या 48 तासात मध्यम ते मुसळधार पावसाची (Of torrential rain) तसेच काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

तसेच पुढील 5 दिवसात मुंबईसह कोंकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरात रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे.
तर मुंबई व कोकण किनारपट्टीस अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे.
आज सकाळपासून मुंबईत अंधेरी, दादर, सायन, कुर्ला, परळ, कुर्ला आदी भागासह पश्चिम उपनगरात पाऊस सुरू आहे.
अनेक भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

तसेच हवामान विभागाने 13 आणि 14 जून या कालावधीत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका सज्ज झाली असून नागरिकांनी समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर महापालिकेने नियंत्रण कक्षांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

अवघ्या 10 दिवसांतच महिन्याभराचा पाऊस
पूर्व मोसमी सरींना असलेला जोर, नियोजित वेळेपेक्षा 2 दिवस अगोदरच मुंबईत दाखल झालेला मान्सून यामुळे यंदा पावसाने जून महिन्याची सरासरी पहिल्या 10 दिवसातच ओलांडली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार मुंबई उपनगरातील पावसाची सरासरी संपूर्ण जून महिन्यासाठी 505 मिलीमीटर आहे. मात्र यंदा 1 ते 11 जून, सकाळी साडेआठ वाजेपर्यंत उपनगरात 534.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : regional meteorologica center mumbai says moderate to heavy rainfall is likely to occur in mumbai and suburbs

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले