Rekha Jare Murder Case : …म्हणून बाळ बोठेनं रेखा जरेंच्या खूनाची दिली होती सुपारी, प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –   यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड (Rekha Jare Murder Case) प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे (Journalist Bal Bothe) याला अखेर अटक झाली आहे. पोलिसांनी त्याला हैदराबादमधून ताब्यात घेतलं आहे. हे हत्याकांड प्रेम प्रकरणातून घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा या प्रकरणातील मोठा ट्विस्ट मानला जात आहे. कारण गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे फरार होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती नगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. बोठेचा शोध कसा लागला याचीही माहिती त्यांनी दिली आहे. माध्यमांसोबत बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं. पोलिसांनी यावर सवाध प्रतिक्रिया दिली.

प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. भविष्यात आपली बदनामी होऊ शकते किंवा गुन्हे दाखल होऊ शकतात म्हणून बाळ बोठे यानं हा टोकाचा निर्णय घेतला होता असं समजत आहे.

नेमकं प्ररकरण काय ?

यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे 30 नोव्हेंबर रोजी पुण्याहून अहमदनगरला येत होत्या. पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. त्यावळी जरे यांच्या मुलानं एका आरोपीचा फोटो काढला होता. याच फोटाेवरून पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासात बाळ बोठेनं सुपारी देऊन हत्या केल्याचं समोर आलं होतं. बोठेला पोलिसांनी हैदराबादच्या बिलालपूर भागातील हॉटेलमधून अटक केली.

मुलानं केली फाशीची मागणी

मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे याला अटक झाल्यानंतर रेखा जरे यांच्या मुलानं समाधान व्यक्त केलं. ज्या पद्धतीनं माझ्या आईची हत्या झाली, त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी केली आहे.

अ‍ॅड सुरेश लगड यांनीही बोठे याला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. समाजात बाळ बोठे याची मोठी दहशत होती. वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेकांना त्यानं त्रास दिला होता. पत्रकारितेचा गैरफायदा घेत त्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळं अशा आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, असं ते म्हणाले.