Jio चा ‘स्वस्त’ आणि ‘मस्त’ प्लॅन, 200 पेक्षा कमी किंमतीत 42 GB डेटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील डिसेंबर २०१९ मध्ये देशातील टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले आहेत. त्यानंतर कंपन्यांनी आपल्या सर्वच प्लॅनमध्ये बदल केले. प्लॅनचे दर वाढल्याने ग्राहकांमध्येही नाराजीचा सूर आहे. ज्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांचाही समावेश आहे. सर्वात स्वस्त आणि फास्टेस्ट नेटवर्कसाठी ओळखली जाणाऱ्या जिओनेही आपल्या प्लॅनमध्ये ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. पण वोडाफोन आयडिया, या अन्य कंपन्यांच्या तुलनेत जिओचे प्लॅन जवळपास २५ टक्के स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यात जिओचा २०० रुपयांचा प्लॅन सामान्यांच्या खिशाला परवडण्याजोग्या देखील आहे, तसेच या प्लॅनमध्ये अधिक इंटरनेट डेटा मिळत आहे.

Reliance Jio चा १९९ रुपयांचा प्लॅन –
१९९ रुपयांच्या या प्लॅनची वैधता २८ दिवस असून यामध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा वापरण्यास मिळतो. म्हणजेच २८ दिवसांसाठी ग्राहकांना ४२ जीबी डेटा वापरण्यास मिळतो. सोबतच रोज १०० एसएमएसची सुविधाही मिळते. या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ कॉलिंग मोफत असून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी १००० नॉन-जिओ मिनिट मिळतात. सोबतच जिओ अ‍ॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन मिळतं. नॉन-जिओ मिनिट संपल्यानंतर ग्राहकांना ६ पैसे प्रतिमिनिट दर आकारले जातील.

दरम्यान, कॉलिंगपेक्षा अधिक इंटरनेट डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन अत्यंत फायदेशीर आहे. इतर कंपन्यांच्या या प्रकारच्या ऑफर प्लॅनसाठी जवळपास २५० रुपये द्यावे लागतात. पण या दोन्ही कंपन्यांच्या प्लॅन्समध्ये अन्य नेटवर्कवरही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/