Reliance Jio चे Top-5 प्री-पेड प्लॅन, यासोबतच प्रीमियम अ‍ॅप सुविधा मिळणार एकदम Free ! जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स जिओच्या पोर्टफोलिओमध्ये एकापेक्षा जास्त रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. रिलायन्स जिओ ने ग्राहकांसाठी रिचार्ज प्लॅन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्यामुळे, ग्राहक बहुतेक वेळेस स्वत: साठी सर्वोत्तम प्लॅन निवडण्यास असमर्थ असतात. आज आपण जिओच्या सर्वोत्तम -5 रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला विनामूल्य डेटा सोबतच विनामूल्य एसएमएस आणि जियो अ‍ॅपची सदस्यता मिळेल.

Jio चा १४९ रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1 जीबी डेटासह दररोज 100 एसएमएस मिळतील. सोबतच,वापरकर्त्यांना या योजनेतील अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 300 एफयूपी मिनिटे दिली जातील, तरीही वापरकर्ते जियो-टू-जियो नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतील. या व्यतिरिक्त कंपनी यूजर्सना जिओ अ‍ॅपचं सबस्क्रिप्शन विनामूल्य प्रदान करेल. आणि या योजनेची वैधता ही फक्त 24 दिवस आहे.

Jio चा १९९ रुपयांचा प्लॅन

जिओच्या या योजनेनुसार वापरकर्त्याला मिळतील प्रत्येक दिवसाला 1.5 GB डाटा सोबतच 100 एसमस चा लाभ मिळेल. तसेच, या योजनेत, वापरकर्ता जिओ-टू-जिओ नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करण्यात सक्षम असला तरीही, अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 एफयूपी मिनिटे दिली जातील. या व्यतिरिक्त कंपनी आपल्या वापरकर्त्यांना जिओ अ‍ॅपची सदस्यता विनामूल्य प्रदान करेल. परंतु या प्लॅनची मुदत फक्त 28 दिवस आहे.

Jio चा २४९ रुपयांचा प्लॅन

जिओच्या या योजनेत ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटासह 100 एसएमएस मिळतील. तसेच या प्लॅननुसा वापरकर्ता जिओ-टू-जिओ नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करण्यात सक्षम असला तरीही, अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 एफयूपी मिनिटे दिली जातील. या व्यतिरिक्त कंपनी यूजर्सना जिओ अ‍ॅपची सदस्यता विनामूल्य प्रदान करेल. त्याचबरोबर या योजनेची वैधता 28 दिवस आहे.

Jio चा 349 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या योजनेत ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटासह 100 एसएमएस मिळतील.तसेच, या योजनेत, वापरकर्ता जिओ-टू-जिओ नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करण्यात सक्षम असला तरीही, अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 एफयूपी मिनिटे दिली जातील. या व्यतिरिक्त कंपनी यूजर्सना जिओ अ‍ॅपची सदस्यता विनामूल्य प्रदान करेल.त्याचबरोबर या योजनेची वैधता 28 दिवस आहे.

Jio चा 399 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या योजनेत ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटासह 100 एसएमएस मिळतील.तसेच, या योजनेत, वापरकर्ता जियो-टू-जियो नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करण्यात सक्षम असला तरीही, अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 2 हजार एफयुपी मिनिटे दिली जातील. या व्यतिरिक्त कंपनी यूजर्सना जिओ अ‍ॅपची सदस्यता विनामूल्य प्रदान करेल. त्याचबरोबर या योजनेची वैधता 56 दिवस आहे.