Reliance JioFiber : ‘WhatsApp’वरुन मिळवा रेजिस्ट्रेशनची माहिती, वार्षिक योजनेत मिळेल मोफत 4K TV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील महिन्यात रिलायन्स जिओ फायबरची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार गुरूवारी जिओ फायबर सेवेचं कमर्शिअल लाँचिंग करण्यात आलं आहे. रिलायन्सने जिओ फायबर अंतर्गत 6 वेगवेगळ्या शुल्क योजना सुरू केल्या आहेत. जिओ फायबरसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया तुम्हाला आता व्हॉट्सअ‍ॅपवर देखील मिळणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरुन संपूर्ण तपशील मिळवा
या व्यतिरिक्त वेबसाइटवर असेही सांगण्यात आले आहे की ग्राहकांना जिओ फायबरविषयी अधिक माहिती हवी असल्यास व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून या 70008-70008 नंबरवरून माहिती मिळवा.

या नंबरवर ‘HELLO’ मॅसेज करा. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर जा आणि या क्रमांकावर ‘हॅलो ‘ संदेश पाठवा . यानंतर, आपल्याला जिओकडून गीगा फायबरशी संबंधितसर्व माहिती मिळेल.

व्हॉट्सअ‍ॅपव्यतिरिक्त जिओ फायबरसाठी नोंदणी करण्यासाठी कंपनीने Jio.com वर प्रक्रिया सांगितली आहे. तसेच कंपनीच्या संकेतस्थळावर स्वतंत्र विभागदेखील देण्यात आला आहे. याशिवाय ग्राहकांना त्यांच्या मोबाइलमध्ये माय जियो अ‍ॅप डाउनलोड करावे लागतील, ज्याद्वारे कंपनी ग्राहकांशी संपर्क साधेल.

काय आहे प्लॅन
या सर्व योजना दरमहा 699 रुपयांपासून ते 8499 रुपयांपर्यंत असतील. जिओ फायबर ब्रॉडबँड सेवा एकूण 1600 शहरांमध्ये उपलब्ध आहेत. दर योजनेनुसार, आपल्याला 100Mbps ते 1Gbps पर्यंत वेग मिळेल. शिवाय 4K सेट टॅप बॅक्स, दूरचित्रवाणी संच, ओटीटी अ‍ॅप आदींचीही जोड निवडक योजना पर्यायांवर आहे. या व्यतिरिक्त आपण वार्षिक प्लॅन सब्सक्राइब केल्यास केबल टीव्ही कनेक्शनसाठी तुम्हाला 5000 रुपयांचे मोफत लाइव्ह होम गेटवे मिळेल, तसेच 4k चा सेट टॉप बॉक्स सुमारे 6400 रुपयांना मिळेल. आपण निवडलेल्या वार्षिक प्लॅननुसार, आपल्याला 24 इंच ते 32 इंच एचडी किंवा 43 इंच एचडीचा 4K टीव्ही देखील मिळेल.