Remedy For Fatigue | तुम्हालाही सतत थकवा जाणवतो का?; जाणून घ्या कारण आणि उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Remedy For Fatigue | सध्या अनेक माणसांच्यात वारंवार थकवा (Fatigue) जाणवत असतो. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शारीरिक कमजोरी (Physical Weakness) अथवा झोप पूर्ण न होणे (Incomplete Sleep) यामुळे वारंवार थकवा जाणवतो. जर तुम्हाला देखील सतत थकवा जाणवत असेल, तर हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी यावर उपाय (Remedy For Fatigue) काय? याबाबत टिप्स जाणून घ्या.

 

थकवा कशामुळे येतो (What Causes Fatigue) ?

1. ज्यावेळी आपण हायड्रेटेड (Hydrated) नसतो तेव्हा आपले शरीर नेहमी थकल्यासारखे वाटते. उन्हाळ्यात, तुम्हाला ही समस्या जादा जाणवते. म्हणूनच उन्हाळ्यात तुम्ही तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवावे. दिवसभरात अधिकाधिक पाणी प्या. यामुळे तुमचा थकवा दूर होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. (Remedy For Fatigue)

 

2. जर तुम्ही निरोगी आहार घेत नसाल तर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. अशा परिस्थितीत जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न (Junk Food And Processed Food) न खाण्याचा प्रयत्न करा.

 

3. तुमच्या शरीरात काही आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असली तरी तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल. वास्तविक, जेव्हा शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता (Vitamin-D Deficiency) असते तेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो.

 

4. पुरेशी झोप घेतली नाही तरी दिवसभर थकवा जाणवतो. खरं तर, झोपेच्या वेळी, तुमचे शरीर आवश्यक संप्रेरक सोडते, ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी उत्साही वाटते.

 

उपाय काय (What Solution For Fatigue) ?

1. शरीरातील ऊर्जा कमी होत आहे असे जेव्हा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॅफिनयुक्त पेये घेऊ नये.

 

2. थकवा घालवण्यासाठी अथवा एनर्जीसाठी केवळ कर्बोदकांचेच सेवन करू नये,
तर काही हेल्दी फूड (Healthy Food) कॉम्बिनेशन्सचा पर्याय तुम्ही निवडू शकता.

 

3. तुमच्या आहारात भरपूर पोषक तत्वांचा (Nutrients) समावेश करा.

 

4. अधिकाधिक पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकून राहते.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Insulin Plant For Diabetes | according to report publish in ncbi insulin plant can lower blood sugar level in diabetes patients naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा