रवी शास्त्रींना प्रशिक्षक पदावरून हटवा

लखनौ : वृत्तसंस्था 

इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत भारताचा ४-१ असा पराभव झाला. कसोटी मालिकेतील पराभवाला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री जबाबदार आहेत. त्यामुळे पदावरून तात्काळ दूर करा, असे विधान अशी मागणी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे क्रीडामंत्री चेतन चौहान यांनी केली आहे. विशेष म्हणजे चौहान यांच्याआधी सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग यांनीही शास्त्री यांना हटविण्याविषयी विधान केले होते.

विद्यमान भारतीय संघ हा परदेश दौरा करणाऱ्या आतापर्यंतच्या भारतीय संघांपैकी सर्वोत्तम आहे, असे वक्तव्य शास्त्री यांनी मध्यंतरी केले होते. त्याबाबत चौहान म्हणाले, की मला ते मान्य नाही. भारतीय संघाची कामगिरी खरे तर सरस व्हायला हवी होती. हे दोन्ही संघ तुलनेने समसमान ताकदीचे होते; पण भारतीय संघाने इंग्लंडच्या तळाच्या खेळाडूंकडे दुर्लक्ष केले.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4f9cab72-bb08-11e8-88f5-35cd8428649e’]

चेतन चौहान म्हणाले की, “शास्त्री चांगले समालोचक आहेत. त्यांना तेच काम करू द्या. शास्त्री उत्तम समालोचक आहेत आणि त्यांना ती जबाबदारी पार पाडण्याची परवानगी द्यावी. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका स्पर्धेत भारताच्या बाजूने अपेक्षित निकाल लागायला हवा होता. कारण भारतीय संघ हा संतुलित आहे. पण तसे झाले नाही. कसोटी मालिकेतील पराभवाला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री जबाबदार आहेत. त्यामुळे शास्त्री यांना आॅस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी पदावरून दूर केले पाहिजे.”

पेट्रोल, दरवाढीची आग आणखी भडकली

 

Loading...
You might also like