तेजस उध्दव ठाकरेंचं नव’संशोधन’, कोयनेच्या खोऱ्यात पालींच्या २ नव्या प्रजाती शोधल्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ‘ठाकरे’ नावाने सगळ्याच क्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेली आहे. राजकीय, सांस्कृतिक, कलात्मक अशा सर्वच गोष्टींची माहिती असलेल्या ठाकरे कुटूंबातील एक व्यक्तिमत्व सध्या प्राणी जीव शास्त्राचा अभ्यास करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे थोरले चिरंजीव आदित्य ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला. तर, आदित्य यांचे लहान बंधु तेजस ठाकरे हे खेकडा प्रजातीवर संसोधन करत आहेत. नुकतेच, तेजस आणि त्यांच्या टीमने पालींच्या दोन नवीन प्रजाती शोधल्या आहेत.

तेजस ठाकरे, इशान अगरवाल आणि अक्षय खांडेकर या तिघांची टीम गेल्या वर्षी पावसाळ्यात संशोधनासाठी गेली होती. यावेळी त्यांनी पालींचे सॅम्पल गोळा करून त्यांच्या डीएनएचा अभ्यास केला. कोयनेच्या खोऱ्यातून सापडलेल्या पालीच्या प्रजातीला ‘निपास्पिस कोयनाएन्सिस’ आणि आंबाघाटामधून सापडलेल्या प्रजातीला ‘निमास्पिस आंबा’ अशी नावं देण्यात आली आहेत.

यापूर्वी तेजस यांनी खेकड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावला असून हा खेकडा ‘ठाकरे’ यांच्याच नावानं ओळखला जात आहे. लाल-जांभळ्या व भगव्या रंगाच्या या खेकड्याला ‘ग्युबर्नेटोरियन ठाकरे’ असं नाव देण्यात आलं होतं. तेजस हे कला शाखेचे विद्यार्थी असून त्यांना वन आणि वन्यजीवांच्या अभ्यासाची आवड आहे. त्यामुळे भटकंती करून नवनवीन विषय त्यांची टीम सतत हाताळत असते.

आरोग्यविषयक वृत्त –