केडगाव यात्रेच्या पालखी, छबिना निघणाऱ्या मुख्य रस्त्याची मोठी दुरावस्था

दौंड | पोलीसनामा आॅनलाइन  – गेल्या दहा वर्षांमध्ये अब्जो रुपयांचा निधी दौंड तालुक्यामध्ये आणून मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आल्याची जाहिरात दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. परंतु या विकासकामांचा जितका उहापोह केला जात आहे तेवढी कामे झाली आहेत का ? याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आजही शंकेचे वातावरण आहे. कारण जर इतका मोठा निधी गेल्या दहावर्षांमध्ये आला असेल तर मग आजही अनेक गावांमध्ये मुख्य रस्तेच काँक्रीटीकरणापासून वंचित का ठेवण्यात आली आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारात आहेत.

… तर माओवादी कनेक्शन प्रकरणी दिग्विजय सिंह यांची होऊ शकते चौकशी 

असाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील केडगाव गावठाण येथे पाहायला मिळत असून केडगावच्या यात्रेसाठी निघणाऱ्या पालखी, छबिना, संदलसाठी वापरण्यात येणारा हा मुख्यरस्ता काँक्रीटीकरणापासून वंचित असल्याचे दिसत आहे. केडगाव गावठाणातील भैरोबा मंदिरपासून मुस्लिम वस्ती करत दलीतवस्तीकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून अजूनही या रस्त्याचे काँक्रीटीकरण झालेले नाही. काही ग्रामपंचायत सदस्यांनी या रस्त्याचे काँक्रीटीकरण त्वरित करण्यात यावे यासाठी केडगाव ग्रामपंचायतकडे मागणीही केली आहे परंतु अजूनही त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. केडगाव यात्रेच्या छबिना, संदल, पालखीसाठी वापरण्यात येणारा हा मुख्य रस्ताच कुटील राजकारणाचा बळी ठरत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. केडगाव गावठाणात विकासाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनी या रस्त्याचे काम  राजकीय कुरखोडीमुळे  लांबवत ठेवले असल्याची चर्चा येथील जेष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.