COVID-19 : आता लाखाच्या गोष्टी सोडा, 27 जूनला होतील जगातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा होईल 1 कोटी, जाणून घ्या 10 Facts

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सुमारे सहा महिन्यांपासून जगभरात प्रकोप सुरू आहे. जवळपास प्रत्येक देश यामुळे त्रस्त आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटनसारखे विकसित देशसुद्धा या महामारीच्या समोर असहाय्य ठरले आहेत. जगात आतापर्यंत 4.72 लाख लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. आता तर सुमारे दिडलाख नव्या केस रोज समोर येत आहेत. या आठवड्यात कोविड-19 ची भीषणता लाखांतून कोटीमध्ये पोहचणार आहे. या आठवड्यात जगात एकुण एक कोटी कोरोना पॉझिटीव्ह केस होऊ शकतात. यामध्ये 5 लाखपेक्षा जास्त भारतीय असतील.

जगात कोरोना पॉझिटीव्ह केसची संख्या 21 जूनला 91 लाखांच्या पुढे गेली आहे. सोमवारी रात्री उशीरा जगात कोरोनाच्या एकुण 91.20 लाख केस होत्या. 8.80 लाख आणखी केस आल्यास ही संख्या 1 कोटीच्या पुढे जाईल. जगात 15 ते 20 जूनच्या दरम्या, म्हणजे सहा दिवसात सुमारे 9 लाख केस आल्या आहेत. जर हाच वेग कायम राहील तर 27 जूनला जगामध्ये एक कोटी कोरोना केस होतील.

कोरोना व्हायरससंबंधी 10 तथ्य :

1. जगात सर्वाधिक (23.70 लाख) केस अमेरिकेत आहेत. येथेच सर्वात जास्त (1.22 लाख) मृत्यू सुद्धा आहेत.

2. ब्राझीलमध्ये सुमारे 11 लाख केस आहेत. अमेरिकेनंतर सर्वात जास्त. येथे 50 हजार लोकांना जीवन गमावला आहे.

3. भारतात आता सुमारे 4.40 लाख केस आहेत. भारतात 26 जूनला हा आकडा 5 लाखांच्या पुढे जाईल.

4. जगात कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट 47% आहे. सुमारे 48.90 लाख लोक कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर बरे झाले आहेत.

5. जगात आतापर्यंत 4.72 लाख लोक कोरोनामुळे जीव गमावून बसले आहेत. ही संख्या 27 जूनला 5 लाख होऊ शकते.

6. जगात 185 देशांत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाले आहेत. सर्वात जास्त मृत्यू यूरोप (सुमारे 1.87 लाख) मध्ये झाले आहेत.

7. भूतान, व्हिएतना, युगांडा, मंगोलिया, नामीबिया, लाओस, फिजी, मकाऊसह सुमारे 27 देशांमध्ये कोरोनामुळे कोणताही मृत्यू झालेला नाही.

8. जगात सर्वात जास्त टेस्ट अमेरिका (2.87 कोटी) मध्ये झाल्या आहेत. भारतात आतापर्यंत 70 लाख लोकांच्या टेस्ट केल्या आहेत.

9. जगात या महामारीचा डेथ रेट 60 (प्रति 10 लाख) आहे. भारतात डेथ रेट 10, बांगलादेशमध्ये 9 आणि पाकिस्तानमध्ये 16 आहे.

10. जगातील 10 देशांमध्ये 2 लाख किंवा यापेक्षा जास्त केस आहेत. यामध्ये अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत, ब्रिटेन, स्पेन, पेरू, चिली, इटली आणि इराणचा समावेश आहे.