Pune News : सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या खानावळ चालकाला 5 हजाराचा ठोठावला दंड

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिक, व्यापारी आस्थापनांविरुद्ध कारवाईचा बढगा उगारला आहे. सुरक्षा नियम धाब्यावर बसवित पालिकेच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सदाशिव पेठेतील एका खानावळ चालकाला 5 हजारांचा दंड आकरण्यात आला असून सदर खानावळ सील केल्याची माहिती सहायक आयुक्त आशिष महाडदळकर यांनी दिली.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनिल मोहिते, आरोग्य निरीक्षक रविराज बेंद्रे, मोकादम रविंद्र कांबळे हे हद्दीमध्ये मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर, थर्मल मशीन, व्हिजीटर नोंदवही याची तपासणी करत होते. त्यावेळी सदाशिव पेठेतील स्वप्निल खानावळीत हे पथक तपासणीसाठी गेले असता. खानावळीत सुरक्षित अंतराचा फज्जा उडाल्याचे दिसले तसेच सॅनिटायजरजा अभाव, मास्क परिधान न करणे अशी परिस्थिती दिसल्याने खानावळ मालकाला पाच हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.