सोसायटीनं दिली रिया चक्रवर्तीला घर सोडण्याची नोटीस, तिला आता मुंबईत घरच मिळेना

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येपूर्वी रिया चक्रवर्ती ही प्रकाशझोतात नव्हती. मात्र, सुशांतने आत्महत्या केल्यानंतर वेगवगेळ्या वादात रियाचे नाव समोर आले आणि ती सतत चर्चेत राहायला लागली. दरम्यान, सातत्याने वादात राहणाऱ्या रियाचे आयुष्य पूर्वीसारखे सुरळीत झालेले नाही. रिया तिच्या कुटूंबासोबत ज्या फ्लॅटमध्ये राहत होती ते घर तिला सोडण्याची वेळ आली आहे.

सोसायटीने रियाच्या कुटूंबियांना घर खाली करण्याची नोटीस दिली आहे. यामुळे रिया सध्या नवीन घराच्या शोधात आहे. पंरतु, रियाला आता घर मिळण्यात अडचण येत असल्याने कुणी देता का घर,? असे म्हणायची वेळ रियावर आली आहे.

रिया आणि तिचे कुटूंबिय आता सांताक्रूझ परिसरात राहतात. ड्रग्ज प्रकरणी नाव समोर आल्यावर तिच्या फ्लॅटबाहेर होणाऱ्या प्रसार माध्यमांच्या गर्दीमुळे सोसायटीच्या सदस्यांनी रिया आणि तिच्या कुटूंबियाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

तुरुंगातून बाहेर आल्यावर रियाला घर सोडण्यासाठी दबाव आणला जात होता. तर दुसरीकडे प्रसार माध्यमाचे कॅमेरे सतत रियाच्या घराबाहेर असतात. त्यामुळे तिचे जगणेही मुश्किल झाले आहे. प्रसार माध्यमांचा मागोवा सोडण्यासाठी रिया नव्या घरात शिफ्ट होण्याच्या विचारत आहे.

रियाच्या शेजारी राहत असलेल्या डिंपलने केलेल्या दाव्यानुसार, १३ जूनला सुशांत सिंग राजपूत रियाला सोडण्यासाठी तिच्या इमारतीत आला होता. १४ जून रोजी सुशांतने वांद्र्यातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, सीबीआय चौकशीत डिंपल हे आरोप सिद्ध करु शकले नाही, असा दावा अनेक माध्यमांनी केला.