PM मोदींच्या ‘त्या’ भाषणावर संतापली ऋचा चड्ढा, म्हणाली – ‘तुम्ही देशाला खरोखरच कॅशलेस केलं’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अद्ययावत तंत्रज्ञानामुळं सरकार आणि सामान्य माणूस यांच्यातील दरी आता पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. अन् त्याचा थेट परिणाम काळ्या पैशांवर झाला. डिजिटल करंसीमुळं देशातील काळा पैसा कमी झाला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मोदींच्या भाषणानंतर बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ऋचा चड्ढा हिनं सताप व्यक्त केला आहे. खरोखरच तुम्ही देशाला कॅशलेस केलं असा उपरोधिक टोला तिनं लगावला आहे.

नासकॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशिप फोरम हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यात पीएम मोदींनी देशाच्या आयटी सेक्टरचं कौतुक केलं. सरकारनं तंत्रज्ञानाचा वापर करून देशात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रशासकीय कामात वेग प्राप्त झाला असं म्हणत मोदींनी देशातील काळ्या पैशावर भाष्य केलं. या भाषणात त्यांनी डिजिटल करंसीमुळं देशातील काळा पैसा कमी झाला असा दावा केला. यावरून आता ऋचा चड्ढा हिनं संताप व्यक्त केला आहे. हे अत्यंत प्रामाणिक विधान आहे. खरोखरच तुम्ही देशाला कॅशलेस केलं असं ती म्हणाली आहे. ऋचानं ट्विट करत यावर भाष्य केलं आहे.

ऋचाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या ट्विटची खूप चर्चा सुरू आहे.