Richest Indian | सावित्री जिंदाल सर्वात श्रीमंत भारतीय महिला, प्रमुख 100 श्रीमंतांमध्ये दिव्या गोकुळनाथ यांच्यासह 6 महिलांना स्थान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Richest Indian | जगभरातील अरबपतींची यादी जारी करणारे मॅगझीन फोर्ब्ज (Forbes) ने प्रमुख 100 भारतीय श्रीमंतांची (Richest Indian) यादी जारी केली आहे. या यादीनुसार प्रमुख 100 भारतीय श्रीमंतांमध्ये 6 भारतीय महिलांचा समावेश आहे. ओपी जिंदाल समुहाच्या (OP Jindal Group) सावित्री जिंदाल (Savitri Jindal) यांना या यादीत सर्वात श्रीमंत भारतीय महिलेचा दर्जा दिला आहे.

प्रमुख 6 श्रीमंत महिलांमध्ये (Richest Indian) बायजुच्या दिव्या गोकुलनाथ (Divya Gokulnath) यांचाही समावेश आहे. तर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) फोर्ब्जच्या यादीत लागोपाठ 14 व्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती ठरले आहेत.

वर्षभरात पाच अरब डॉलर वाढली Savitri Jindal यांची संपत्ती
फोर्ब्जने 71 वर्षीय सावित्री जिंदाल (Richest Indian) यांची संपत्ती 18 अरब डॉलर म्हणजे 13.46 लाख कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे. मागील वर्षी त्यांची संपत्ती 13.04 अरब डॉलर सुमारे 9.72 लाख कोटी रुपये होती. ओव्हरऑल लिस्टमध्ये सावित्री जिंदाल यांना सातवे स्थान मिळाले आहे.

दुसर्‍या स्थानावर Vinod Rai Gupta
हॅवेल्स इंडिया (Havells India) च्या विनोद राय गुप्ता (Vinod Rai Gupta) 7.6 अरब डॉलर म्हणजे सुमारे 5.68 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसर्‍या सर्वात श्रीमंत भारतीय महिला ठरल्या आहेत. यादीत गुप्ता यांना 24वे स्थान मिळाले आहे. त्यांची संपत्ती मागील एक वर्षात सुमारे दोन पट झाली आहे. 2020 मध्ये त्यांची संपत्ती 3.55 अरब डॉलर म्हणजे 2.65 लाख कोटी रुपये होती.

तिसर्‍या स्थानावर Leena Tewari
यादीत 43 व्या स्थानावर असलेल्या लीना तिवारी (Leena Tewari) तिसर्‍या सर्वात श्रीमंत भारतीय महिला आहेत. लीना मुंबई येथील यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेड (USV Pvt Ltd) कंपनी चालवतात, जी औषध आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे.

43 वर्षीय लीना यांची एकुण संपत्ती 2021 मध्ये 4.4 अरब डॉलर म्हणजे 3.28 लाख कोटी रुपये नमूद करण्यात आली आहे.
वर्षभरापूर्वी लीना यांची संपत्ती सुमारे 3 अरब डॉलर म्हणजे 2.24 लाख कोटी रुपये होती. लीना तिवारी उद्योजक कुटुंबातील आहेत.
त्यांच्या वडीलांनी रेव्हलॉन कंपनीची स्थापना केली होती.

Byju च्या Divya Goukulnath चौथ्या श्रीमंत महिला
एज्युकेशन कंपनी बायजु (Byju’s) च्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ (Divya Gokulnath) यादीत 47व्या स्थानावर आहेत
आणि चौथ्या सर्वांत श्रीमंत महिला आहेत. दिव्या यांची संपत्ती वर्षभरात चारपट वाढली आहे.
2020 मध्ये त्यांची संपत्ती एक अरब डॉलर म्हणजे 7,477 कोटी रुपये होती,
जी वाढून 2021 मध्ये 4.05 अरब डॉलर म्हणजे 3.02 लाख कोटी रुपये झाली आहे.

कमी झाली Kiran Mazumdar-Shaw यांची संपत्ती
पाचव्या स्थानावर बायोकॉन (Biocon) च्या किरण मजुमदार शॉ (Kiran Mazumdar-Shaw ) आहेत.
68 वर्षीय शॉ यांना यादीत 53वे स्थान मिळाले आहे. मागील वर्षाच्या दरम्यान किरण शॉ यांची संपत्ती मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे.
2020 मध्ये त्याची संपत्ती 4.6 अरब डॉलर म्हणजे 3.43 लाख कोटी रुपये होती,
जी आता 3.9 अरब डॉलर म्हणजे 2.91 लाख कोटी रुपयांवर आली आहे.

यादीत 73व्या स्थानावर मल्लिका श्रीनिवासन (Mallika Srinivasan) सहाव्या सर्वात श्रीमंत भारतीय महिला आहेत.
मल्लिका यांची संपत्ती वाढून 2.89 अरब डॉलर म्हणजे 2.15 लाख कोटी रुपये झाली आहे.
त्या ट्रॅक्टर्स अँड फार्म इंडिया लिमिटेड (Tractors and Farm Equipment Limited / TAFE) च्या चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

Web Title :-  Richest Indian | savitri jindal and divya gokulnath are among richest indian women mukesh ambani tops the forbes list in consecutive 14 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | बारा लाखांची फॉच्युनर 50 हजार देऊन घेऊन गेला; गाडी गेली वर कर्जाचे हप्ते थकविले, शेतकर्‍याची फसवणूक

PM-Kisan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! 10वा हप्ता मिळवण्याची शेवटची संधी, आता 13 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम; जाणून घ्या

Rupali Chakankar | आयकर विभागाच्या कारवाईचा हिशोब व्याजासकट चुकता केला जाईल, रुपाली चाकणकर यांचा ‘घणाघात’