ये ‘परश्या’ तुझी ‘आर्ची’ लगीन करतीया लगीन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सैराट सिनेमातून घराघरात पोहोचणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने आणि संवादाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या रिंकु राजगुरू नुकतीच तिची बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. आर्ची म्हणजेच रिंकु राजगुरूने तिच्या वेगळ्या शैलीने खरंच प्रेक्षकांना याड लावलं असं म्हणायला हरकत नाही. खूप कमी वेळात तिने आपली वेगळी जागा तयार केली आहे. रिंकु आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ऐकून चकित झाला असाल ना ?

तुमची लाडकी आर्ची लग्न करत आहे हे वाचून अनेकांना नक्कीच धक्का बसला असेल. सध्या रिंकु राजगुरूचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत रिंकुचा लुक पाहिला तर कदाचित तुम्हालाही असे वाटू शकते की ती लग्न करत आहेत. कारण या फोटोत रिंकु एखाद्या नववधूप्रमाणे दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की, तिचा लुक नेमका कशासाठी आहे.

https://www.instagram.com/p/Bx64U9eJdZo/

नववधूच्या लुकमधील रिंकुचे हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सोशलवर सुरु आहे. परंतु रिंकचा हा लुक एखाद्या कार्यक्रमातील आहे की, तिच्या आगामी सिनेमातील आहे हेदेखील समोर आलेलं नाही. रिंकुच्या या लुकने सर्वांना मोहित तर केलेच आहे परंतु तिने या फोटोंमधून चाहत्यांची उत्सुकताही कमालीची वाढवून ठेवली आहे.

रिंकुच्या लग्नाच्या वृत्ताला रिंकु किंवा तिच्या जवळच्यांपैकी कोणीही दुजोरा दिलेला नाही. असे असले तरी फोटोंमुळे मात्र तिच्या लग्नाची चर्चाच सुरु आहे. रिंकुच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर नुकतीच ती कागरमधू प्रेक्षकांच्या भेटील आहे तर मेकअप या सिनेमातून ती पुन्हा झळकणार आहे.

https://www.instagram.com/p/Bs4Z9zrBNEp/