ऋषी कपूर यांनी उपचारासाठी अमेरिकेला जाण्याआधी रेकॉर्ड केला होता ‘हा’ व्हिडीओ ! रवीना टंडननं आता केला सोशलवर शेअर (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –दिग्गज स्टार ऋषी कपूर यांनी दि 30 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. आता अभिनेत्री रवीना टंडन हिनं त्यांना मिस करत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ ऋषी कपूर यांनी 2018 मध्ये अमेरिकेसाठी रवाना होण्याच्या आधी रेकॉर्ड केला होता.

https://twitter.com/30Kumaar/status/1258756397388361728?s=20

रवीनानं जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यात ऋषी कपूर रवीनाचे वडिल रवी टंडन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या आणि नीतूच्या भेटीबद्दल इतरही बरंच काही बोलत आहेत. ऋषी म्हणतात, “हाय रवी जी तुम्हाला 80 व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपली भेट 42 वर्षे जुनी आहे. बहुतेक आपण 1973 मध्ये भेटलो होतो. आपण खेल खेल में मध्ये पहिल्यांदा सोबत काम केलं आहे नीतू आणि मी. नीतू आणि मी आणखीही काही सिनेमात काम केलं जसं की, झूठा कहीं का, राही बदल गए, आन और शान. मला तुमच्या सोबत काम करताना खूप मजा आली. आपला ताळमेळ पण खूप छान होता. खरं तर माझं आणि नीतूचं भेटणं तुमच्यामुळंच झालं आहे.”

साजन कीं बाहों में या सिनेमात रवीना टंडन आणि ऋषी कपूर यांनी एकत्र काम केलं आहे. व्हिडीओ शेअर करताना रवीना म्हणते, “प्रिय चिंटू अंकल… तुम्हाला प्रत्येक दिवशी मिस केलं जाईल. हा व्हि़डीओ तुम्ही न्यूयॉर्कला उपचारासाठी जाण्याच्या आधी रेकॉर्ड केला होता आणि पप्पांच्या वाढदिवशी त्यांच्याकडे येऊन त्यांना सरप्राईजही दिलं होतं. तुम्ही कायम माझ्या आणि आम्हा सर्वांच्या हृदयात रहाल चिंटू अंकल.”