Video : ‘रितेश-जेनेलिया’ची वीकेंड पार्टी ! ‘झिंगाट’ गाण्यावर केला तुफान डान्स, ‘या’ कलाकारांनीही दिली साथ

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलीवूड स्टार रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अ‍ॅक्ट्रेस जेनेलिया डिसूजा (Genelia D’Souza) यांनी 8 वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. आज ते बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून ओळखले जातात. अलीकडेच रितेश आणि जेनेलियाचा एक रोमँटीक व्हिडीओ समोर आला होता ज्यामुळं ते चर्चेत आले होते. यानंतर आता पुन्हा एकदा काही व्हिडीओंमुळं त्यांनी लक्ष वेधलं आहे.

जेनेलियानं तिच्या इंस्टावरून काही व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ जेनेलिया आणि रितेश यांच्या वीकेंडच्या पार्टीचे आहेत. यात आशिष चौधरी, शमिता बंगारगी, कुमकुम भाग्य फेम शब्बीर अहलूवालिया आणि त्याची पत्नी काची कौल असे सगळे सहभागी झाले होते. रितेश आणि जेनेलिया हे या पार्टीचे स्टार होते.

सदर 6 मित्रांनी पार्टीत झिंगाट गाण्यावर तुफान डान्स केला. शनिवारी रात्री या सर्वांनी या पार्टीचा आनंद घेतला. याचेच व्हिडीओ जेनेलियानं शेअर केले आहेत.

जेनेलियानं शेअर केलेले हे पार्टीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हे व्हिडीओ शेअरही केले आहेत.

रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो बागी 3 या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्या सोबत टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. 6 मार्च 2020 रोजी हा सिनेमा रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसला परंतु कोरोनाचा कहर सुरू झाल्यानं थिएटर बंद करण्यात आले आणि सिनेमाच्या कमाईला मध्येच ब्रेक लागला.