अभिनेत्री प्रियंका चोप्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सदस्य बनली आहे का ? कारण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सदस्य बनली आहे का ? कारण RSS च्या बहाण्याने प्रियंका आता पुन्हा ट्रोल झाली आहे. ट्रोल होण्याचे कारण म्हणजे प्रियंकाने घातलेली खाकी शॉट पॅंट. ती बुधवारी ब्लॅक टॉप आणि ब्लॅक कोटमध्ये स्पॉट झाली आहे. प्रियंकासोबत निकपण होता.

जशी प्रियंका स्पॉट झाली तसे लगेचच तिला युजर्सने ट्रोल करण्यास सुरुवात केली. आपण शाळेत मुलांच्या अंगावर खाकी कलरचा गणवेश पाहतो. तसाच प्रियांकाने खाकी कलरची शॉट पॅंट घातली आहे. या फोटोला पाहून युजर्सचे म्हणणे आहे की, RSS शाखाची सीर‍ियस मीट‍िंग अटेंट करायला चालली आहे प्रियंका.

काही युजर्सने या शाखेत सहभागी झालीस का? अशी कमेंट केली आहे. एका युजरने लिहले की, प्रधानमंत्री मोदींच्या राज्यात RSS चा विस्तार होत आहे. आता प्रियंका प्रधानमंत्री होणार. प्रियंकाची प्रधानमंत्री मोदींसोबत मुलाखत आणि खाकी निकरचे फोटो एडीट करुन असे लिहले जात आहे की, प्रियंकाने आरएसएसची सदस्य बनण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक युजर्सने प्रियंकाला आरएसएसचा इंटरनेशनल ब्रांड एम्बेसडर असे म्हणले आहे.

काही दिवसांपुर्वी प्रियंका बोस्टनमध्ये आई मधू चोप्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहचली होती. प्रियंका आणि निकने मधू चोप्राच्या वाढदिवसाचे स्पेशल आयोजन केले होते. तिचा एक विना ब्लाऊजचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. सध्या प्रियंका बॉलिवूड प्रोजेक्ट्सवर पुर्ण लक्ष केंद्रित करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

Loading...
You might also like