लालूंच्या मुलीची दादागिरी ; केंद्रीय मंत्र्यांचे हात तोडण्याची भाषा

दिल्ली : वृत्तसंस्था – ‘जेव्‍हा मला माहिती मिळाली की, राम कृपाल यांनी राष्‍ट्रीय जनता दल सोडून भाजपात गेले आहेत. यानंतर मला त्‍यांचे हात तोडावे असे वाटले.’या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे राष्‍ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची मुलगी खासदार मीसा यादव चर्चेत आल्‍या आहेत. पटनाजवळील विक्रम भागामध्‍ये एक सभा आयोजित करण्‍यात आली होती. या सभेत खासदार मीसा यादव यांनी हे वक्तव्य केलं.

भय्यू महाराज मृत्यू प्रकरण : अश्लिल व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्याऱ्या तरुणीसह दोघांना अटक

राम कृपाल यादव पहिल्‍यांदा राष्‍ट्रीय जनता दलात होते. राम कृपाल यादव लालूंच्‍या जवळचे कार्यकर्ते होते. मात्र २०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीच्‍याआधी लालूंच्‍या राष्‍ट्रीय जनता दल सोडून थेट भाजपात प्रवेश केला. त्‍यांना डावलून पाटलिपुत्रमधून लालूंची मुलगी मीसा यादव यांना उमेदवारी देणे हे कारण आरजेडी सोडण्‍याचे होते. २०१४ मध्‍ये भाजपने राम कृपाल यादव यांनी पाटलीपुत्रमधून उमेदवारी दिली होती. मीसा यादव यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.
खासदार मीसा यादव यांनी केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव यांच्‍याबाबतीत एक वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले आहे. त्या म्‍हणाल्‍या की, ‘राम कृपाल यादव आमच्‍या येथे चारा कापण्‍याचे काम करत होते. त्‍यांच्‍याविषयी आमच्‍या मनात सन्‍मान, आदर आहे. मात्र हा सन्‍मान तेव्‍हाच संपला जेव्‍हा त्‍यांनी सुशीलकुमार मोदी यांच्‍याशी हातमिळवणी केली. त्‍याचवेळी मला वाटले होते की, चारा कापण्‍याचे यंत्रानेच त्‍यांचे हात कापावे’. मी या निवडणुकीत विजयी होणार याची मला पूर्णपणे खात्री आहे. २०१४ मध्‍ये मला तयारी करता आली नव्‍हती, असे सभेदरम्‍यान मीसा यादव म्‍हणाल्‍या.
बेहिशेबी संपत्ती प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या ज्येष्ठ कन्या मीसा भारती यांच्या संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणली आहे.मीसा भारती, त्याचे पती शैलेश कुमार आणि अन्य काही जणांवर ५ हजार कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे.