‘रोडीज’चं Live ऑडिशन सुरू असतानाच नेहा धुपियाच्या मुलीनं घेतली ‘एन्ट्री’, पुढं झालं ‘असं’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सध्या लॉकडाऊनमुळं सारं काही ठप्प आहे. अशातच आता अनेक रिअॅलिटी शो असे आहेत ज्यांनी ऑनलाईन ऑडिशनला सुरुवातही केली आहे. यात केबीसी आणि रोडीज अशा शोचा समावेश आहे. मेकर्सला विश्वास आहे की, लवकरच सर्व काही ठिक होईल.

सध्या सर्वकाही ठप्प असल्यानं मेकर्स ऑनलाईनचा सहारा घेताना दिसत आहेत. सध्या बाकी लोक ज्याप्रमाणे वर्क फ्रॉम होम करत आहेत त्याच प्रमाणे आता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीही वर्क फ्रॉम होत करत आहे. असंच घरून काम करताना नेहा धुपियासोबत एक मजेदार किस्सा घडला आहे. नेहा रोडीजची लिडर आहे. नुकतच ती एका स्पर्धकाचं ऑडिशन घेत होती. अचानक तिची मुलगी मेहर मागून आली आणि तिच्यासोबत मस्ती करू लागली.

नेहा रोडीजची जज असली तरी ती एक आईदेखील आहे. यावेळी ती थोडी इमोशनल झाल्याचंही दिसून आलं. नंतर पती अंगद बेदीनं मेहर तिथून बाजूला नेलं. एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात हे सगळं दृश्य दिसत आहे. नेहानंच तिच्या इंस्टावरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत एका स्क्रीनवर नेहा दिसत आहे. एका स्क्रीनवर निखिल चिनप्पा आहे जो कॉफी पित स्नॅक्सचा आनंद घेत आहे. आणि तिसरीकडे कंटेस्टंट गिटार प्ले करत होता.

निखिलंन केलं हे वक्तव्य

मेहरची मस्ती पाहिल्यावर निखिल म्हणाला, “ऑडिशनमध्येच खूप काही होताना दिसत आहे. म्युझिक, ड्रामा, अॅक्शन, फॅमिली ड्रामा असं सारं काही होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like