पाकिस्तानचा मोठा निर्णय, ‘या’ प्रांतातील रस्त्यांना काश्मीरचं नाव !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सरकारने तेथील मोठ्या ३६ रस्त्यांना आणि ५ उद्यानांना काश्मीरचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मिरी नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांनी म्हटले आहे.

भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० केल्यानंतर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेश घोषित केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा हाहाकार उडाला होता. पाकिस्तानने या निर्णयाचा निषेध करण्यासाठी भारताबरोबरचे सर्व राजनैतिक संबंध देखील तोडून टाकले होते. त्याचबरोबर भारताबरोबरचे व्यापारी संबंध देखील तोडून टाकले होते. पंजाब प्रांतातील ३६ रस्त्याना ‘काश्मीर रोड आणि उद्यानांना काश्मीर पार्क असे नाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर पाकिस्तानने या निर्णयाच्या विरोधात संयुक्त राष्ट्रात देखील धाव घेतली होती. मात्र चीन सोडून त्यांना कोणत्याही राष्ट्रांनी त्यांना पाठिंबा दिला नाही.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये या निर्णयावरून खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात राजकीय बैठका होत असून पाकिस्तान काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like