हिंजवडीतील बारामती ज्वेलर्स फोडले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

हिंजवडीतील शिवाजी चौकात असणाऱ्या बारामती ज्वेलर्सच्या भिंतीला मोठे भगदाड पाडून सुमारे दीड किलो चांदीचे दागिने आणि सोने असा ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री आठ ते बुधवारी सकाळी दहा या वेळेत घडला आहे.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ee5ec20f-ab79-11e8-a915-7b424602e80d’]

वर्दळीच्या आणि आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या मुख्य चौकात ज्वेलर्स फोडल्याने व्यापाऱ्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्र दिवस वर्दळ सुरु असलेल्या चौकात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी संतोष मधुकर लोळगे (३७, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोळगे हे बारामती ज्वेलर्समध्ये व्यवस्थापक आहेत. शिवाजी चौकातील साखरे इमारतीमध्ये बारामती ज्वेलर्स आहे. मंगळवारी रात्री नेहमी प्रमाणे दुकान बंद करून सर्व कामगार घरी गेले होते.

पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या  ‘त्या’ पाच जणांबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राज्य सरकारला नोटीस  

बुधवारी सकाळी पुन्हा दुकान उघडले असता दुकानातील दागिने चोरीला गेल्याचे दिसले. तत्काळ हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेचे पोलिसही दाखल झाले. पाहणी केली असता दुकानाच्या मागील भिंतीला मोठे भगदाड पाडून चोरटे आत घुसले होते. चोरट्यानी चांदीचे अंगठ्या, लक्ष्मी, गणेश मूर्ती, लहान मुलांच्या सोन्याच्या अंगठ्या, एक ग्रॅम वजनाचे दागिने आणि गल्ल्यातील दोन हजार रुपये असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.

गणेशोत्सवाची सुरुवात करण्यावरुन पुण्यात वाद पेटणार