आता नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेल्यावर चक्क ‘रोबोट’ मुलाखत घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आता नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेल्यावर अधिकारी नाही तर चक्क रोबोट तुमची मुलाखत घेणार आहेत. हे ऐकल्यावर सर्वांनाच धक्का बसेल परंतु हे खरे आहे.

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्त्व खूप वाढतंय. उमेदवारांच्या मुलाखती रोबोट घेत असून रोबोट एल्गोरिदमच्या मदतीने लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्या आवाजावरून त्यांच्यात आत्मविश्वास आहे की नाही याची चाचपणी होतेय. एवढेच नाही तर उमेदवार खूश आहेत की नाही. ते पाहिलं जातं आहे.

पोलीसनामावरील ताज्या बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन पोलीसनामाचे फेसबुक पेज आत्ताच लाईक करा.👇👇

हा प्रयोग रोबोटिक व्हिडिओ असेसमेंट साॅफ्टवेअर कंपनी वापरतेय. एक्सिस बँकचे एचआर प्रमुख राजकमल वेंपती म्हणाले की, गेल्या वर्षी २ हजार कस्टमर सर्विस ऑफिसर्सची भरती 40 हजारापेक्षा जास्त उमेदवारांमधून केली.