Rochelle Rao | 5 महिन्यांची गरोदर असून केला तीन तास शो होस्ट; अभिनेत्री रोशेल राव हिच्यावर कौतुकाचा वर्षाव

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रोशेल राव (Rochelle Rao) ही लवकरच आई होणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मधून घराघरात लोकप्रिय झालेली रोशेल ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर तिच्या नवऱ्यासोबत केलेले फोटोशूट शेअर करुन तिने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. अभिनेत्री रोशेल राव आणि तिचा पती कीथ सिकेरा (Keith Sequeira) हे लवकरच आई वडील होणार असल्याने सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांनी केलेले मॅटरनिटी शूट (Rochelle Rao Maternity Shoot) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता अभिनेत्री रोशेल (Rochelle Rao) हिने सोशल मीडियावर केलेली पोस्ट देखील व्हायरल होत आहे. यामध्ये तिने 5 महिन्यांची प्रेगेंट असताना देखील शो होस्ट केला असल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्री रोशेल राव ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने अनेक मालिका केल्या असून शो देखील केले आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर देखील रोशेल सक्रिय असून अनेकदा ती आपल्या लाईफ अपडेट शेअर करत असते. लवकरच ती आता आई (Rochelle Rao Mom To Be) होणार आहे. रोशेल ही प्रेंगेन्ट असून शो करत आहे. तिने एका इव्हेंटमध्ये 5 महिन्याची गरोदर असताना देखील तीन तास होस्टिंग केले आहे. रोशेल राव हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने 5 महिन्यांचे बेबी बंप कसे लपवले आहे ते सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. यावेळी रोशेलने ग्रीन कलरचा वन पीस स्टाईल केला आहे. पल्जिंग नेकलाइन असलेल्या या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलले होते. सोबत तिने हाय पोनी हेअरस्टाईल केली होती. रोशेलने या लूकमध्ये बेबी बंप लपवले आहे.

ही व्हिडिओ शेअर करत रोशेल राव हिने तिचे गरोदरपणामध्ये देखील काम करण्याचा अनुभव आणि सलग तीन तास
होस्टिंग याबद्दल तिचा अनुभव शेअर केले आहे. रोशेल राव हिने लिहिले आहे की, “मी 5 महिन्यांची गरोदर असताना
3 तासांचा अवॉर्ड शो होस्ट करत असताना मला स्वतःचा अभिमान वाटला! शो मध्ये इतकी सुंदर दिसत होते.
हे मला खूप आवडले. माझ्या या लूकसाठी श्रद्धा मानस्कर हिला खूप थॅंक्यू. पण शो झाल्यानंतर खूप थकले होते.
गरोदरपणाची वास्तविकता तेव्हा मला जाणवली! तरीही मी काहीतरी नवीन करत आहे… बाळाला जन्म देण्यासाठी
तयार होत आहे.” अशा शब्दांमध्ये अभिनेत्री रोशेल राव (Rochelle Rao) हिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Subhedar Movie | ‘सुभेदार’ चित्रपटासाठी नागराज मंजुळेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय