
Rohit Pawar | शरद पवार व गौतम अदानी भेटीवर रोहित पवारांनी मांडले स्पष्ट मत; म्हणाले…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar | प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे (Rohit Pawar). दोन दिवसांपूर्वी अदानी ग्रुपला राज्यामध्ये दोन मोठे कंत्राट मिळाले आहेत. या अंतर्गंत अदानी समूहावर पुणे, बारामती, कोकण, भांडुप व कल्याण या ठिकाणांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानंतर शरद पवार यांनी गौतम अदानी यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात होते. पण यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Rohit Pawar On Gautam Adani Sharad Pawar Meeting)
गौतम अदानी यांच्या घरी असणाऱ्या खाजगी कार्यक्रमासाठी शरद पवार यांनी हजेरी लावली होती अशी माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर या भेटीचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले. यानंतर रोहित पवार यांनी शरद पवार व गौतम अदानी यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “शरद पवार हे जसे छोट्या व्यावसायिकांना भेटतात तसेच अदानी, अंबानी या व्यावसायिकांना देखील भेटतात. त्यात वेगळे काय आहे. या क्षेत्रातील सर्वांना भेटल्यानंतर देशातील आणि राज्यातील विकासाबद्दल चर्चा होत असते. आणि त्यामुळे पॉलिसी देखील तयार करता येते. समाजातील सर्व घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी तयार करता येत नसते” असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे. (Rohit Pawar)
आमदार रोहित पवार हे सध्या ॲक्शनमोडमध्ये आले असून सत्ताधाऱ्यांवर विशेषतः अजित पवार गटाबाबत ते
आक्रमक भूमिका मांडताना दिसून येतात. शिवसेनेच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत देखील रोहित पवारांनी प्रतिक्रिया
दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, “सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत जसे नियोजन केले होते
तसे आत्ता देखील झाले पाहिजे. मागच्या तीन महिन्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काय केले हे संपूर्ण राज्याला सांगावे. स्वाभिमानी राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष असताना सुद्धा त्यांना दिल्लीला जाऊन मार्गदर्शन घ्यावे लागते आहे, ही आश्चर्याची आणि दुर्दैवी गोष्ट असल्याचे सांगत रोहित पवारांनी नार्वेकरांना खोचक टोला लगावला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update