Girish Mahajan On Eknath Khadse | ‘त्यांना सगळी पदं आपल्याच घरात पाहिजेत’, खडसेंच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचा टोला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Girish Mahajan On Eknath Khadse | भापचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांची कुटुंबापूरतीच पार्टी आहे. एकाच कुटुंबात खडसे यांना जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ पाहिजे, आमदारकी देखील हवी असते आणि खासदारकी देखील पाहिजे असते. घरात जेवढे लोक आहेत, तेवढी पदं त्यांना पाहिजे असतात, असा टोला महाजन यांनी लगावला आहे. (Girish Mahajan On Eknath Khadse)

गिरीश महाजन पुढे म्हणाले, खडसे यांना सर्व पदे ही घरातल्या घरात पाहिजेत, त्यामुळे खडसे यांनी कुटुंबात ठरवावे कोणाला कोणतं पद द्यायचं ते, एकमेकांच्या विरोधात असतील तरी चालेल पण त्यांना सर्वच पदे घरात ठेवायची आहेत. पक्षानं संधी दिली तर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला आहे. (Girish Mahajan On Eknath Khadse)

यावेळी आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर महाजन यांनी भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांचा जर भाजपने
राजीनामा घेतला तर त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता.
यावर बोलताना महाजन यांनी म्हटलं की, बच्चू कडू हे आमचे सहकारी आहेत. ते असं का बोलले हे मला माहित नाही.
त्यांनी असं भविष्य का वर्तवलं ते माहित नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Supriya Sule | ‘ते वक्तव्य अजित पवारांना उद्देशून नव्हतं’ सुप्रिया सुळेंनी केला खुलासा (व्हिडिओ)