Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांकडून अजित पवारांवर गंभीर आरोप, ”काकांनी मला अडचणीत आणण्यासाठी…”

मुंबई : Rohit Pawar On Ajit Pawar | मला वाईट याचे वाटते की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पूर्वीपासूनच गुंडांना भेटत असावेत. आमच्या काकांनीसुद्धा मला अडचणीत आणण्यासाठी माझ्या मतदारसंघातील गुंडाला जवळ केले आहे. ही तुमची वृत्ती आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे. ते विधानभवनात पत्रकारांशी बोलत होते.(Rohit Pawar On Ajit Pawar)

आमदार रोहित पवार म्हणाले, दादांना माझा असा प्रश्न आहे की भाजपाच्या जवळ गेल्यानंतर तुम्ही गुंडांचा वापर करणार का? गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंना गुंड भेटतात. देवेंद्र फडणवीसांना गुंड भेटतात. अजितदादांना गुंड भेटतात. मग लोकसभेला गुंडाचा वापर करणार आहात का?

रोहित पवार म्हणाले, एसआयटीचा मुद्दा कोणी मांडला? भाजपाच्या आमदाराने मांडला. एसआयटी कोणी गठीत केली? तर एसआयटी भाजपाच्या अध्यक्षांनी गठीत केली. अशा परिस्थिती टार्गेट कोणाला प्रयत्न केला जात आहे? त्यामुळे भाजपाचे टार्गेट एकनाथ शिंदे नाही ना, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यावर राजकीय आरोप करत काल भाजपा आमदारांनी त्यांच्या एसआयटीची मागणी केली, यानंतर अध्यक्षांनी तसे आदेशही दिले. त्यानंतर आज विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर आरोप केले आहेत.

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे गुंडांशी असलेले लागेबांधे समोर येत आहेत, यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : ‘मी इथला भाई आहे’ सुट्ट्या पैशांवरुन रिक्षा चालकाकडून प्रवाशाला दगडाने मारहाण, आरोपी गजाआड

Maharashtra News | काय सांगता ! होय, चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी ! मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जुन्या वादातून तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण, 6 जणांना अटक