Rohit Pawar On Tanaji Sawant | अधिकाऱ्यांच्या नांग्या मारणारा भ्रष्टाचाराचा खेकडा कोण? रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पुणे : Rohit Pawar On Tanaji Sawant | भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आता आमदार रोहित पवार यांनी राज्यसरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation – PMC) आरोग्य प्रमुखपदी असलेल्या डॉ. भगवान पवार (Dr Bhagwan Pawar) यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लिहिलेल्या पत्रात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत.

आरोग्य प्रमुखपदी असलेल्या डॉ. भगवान पवार यांच्या पात्रातील उल्लेख काय ?

“मी सार्वजनिक आरोग्य विभागातील ज्येष्ठतम अधिकारी असून माझी एकूण ३० वर्षांची सेवा झालेली आहे. मागच्या पाच वर्षात माझी कामगिरी अत्यंत चांगली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची माझ्या कामाबाबत कोणतीही तक्रार नाही. करोना काळात मी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. आयुक्त, आरोग्य सेवा, मुंबई, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडून माझा वेळोवेळी सत्कार झाला आहे. माझे कामकाज आणि सेवेची नोंद उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून मला त्रास देण्याच्या हेतूने माझे निलंबन करण्यात आले आहे. मा. मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे आणि इतर कामामध्ये मदत करण्यास दबाव आणला होता. परंतु मी नियमबाह्य कामात मदत केली नाही हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक करून निलंबन केले” असे मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात डॉ. भगवान पवार यांनी म्हंटले आहे.

तर याबाबत आक्रमक होत आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स साईटवर पोस्ट करत सरकारला खडेबोल सुनावले आहेत. अधिकाऱ्यांच्या नांग्या मारणारा भ्रष्टाचाराचा खेकडा कोण ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या एक्स साईटवर पोस्ट मध्ये नेमकं काय म्हंटलय

“आरोग्य विभागात रुग्णवाहिका खरेदीमध्ये साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या ‘खेकड्या’ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केलीय.
नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडं केलीय.
नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयान बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि
असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या य मंत्र्याला मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे साहेब आपण
अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली
ही किड काढण्यासाठी शस्त्रक्रिया कधी करणार?” असा सवाल आमदार रोहित पवारांनी विचारला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…