Rohit Sharma fined Rs 24 lakh | मुंबई इंडिअन्सचा दुष्काळात तेरावा महिना; रोहित शर्माने पुन्हा ‘ती’ चूक केली तर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Sharma fined Rs 24 lakh | आयपीएलला (IPL 2022) सुरूवात झाली आहे मात्र तब्बल पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडिअन्सला (Mumbai Indians) काही विजयाचं खातं उघडता आलं नाही. मुंबईचे सलग पाच पराभव झाले आहेत. बुधवारी झालेल्या सामन्यामध्येही पंजाबने मुंबईचा पराभव केला. मात्र त्यासोबतच मुंबईला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला तब्बल 24 लाखांचा दंड (Rohit Sharma fined Rs 24 lakh) ठोठावण्यात आला आहे.

 

 

रोहित शर्माला (Rohit Sharma) स्लो ओवर रेटसाठी दंड  करण्यात आला आहे. पुढच्या सामन्यावेळीसुद्धा असेच झाले तर त्याला एका सामन्यात खेळता येणार नाही. स्लो ओव्हर रेटच्या (Slow Over Rate Rule) नियमांनुसार, एखाद्या संघाने जर सीझनमध्ये पहिल्यांदा ही चूक केली तर त्या संघाच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड ठोठावला जातो.

 

 

दुसऱ्यांदा चुक झाली तर कर्णधारासोबत अंतिम अकरा खेळाडूंनाही दंड भरावा लागतो. परत जर ही चूक केली

तर कर्णधाराच्या दंडाची किंमत ही 25 लाख होते आणि संघातील इतर खेळाडूंना 6 लाख नाहीतर 25 टक्के सामन्यातील मानधन कमी होतं.

 

 

रोहित शर्माला आता काळजी घ्यावी लागणार आहे. मुंबईचा पाचवा पराभव असला तरी हा पहिल्यांदाच असं झालं नाही.

याआधी 2014 मध्ये मुंबईने पहिले 4 सामने गमावूनही जबरदस्त पुनरागमन केले आणि नंतर हा संघ प्लेऑफसाठी

(Playoffs) देखील पात्र ठरला, प्लेऑफमध्ये मात्र त्यांचा पराभव झाला होता.

 

 

NCB Officer Amit Gawate | एनसीबीच्या मुंबईतील विभागीय संचालकपदी अमित गवाटे

Indurikar Maharaj Accident | प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान प्रकरणी NCB च्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन