रोहित शर्माचं वादळी शतक, भारताने टी-20 मालिका जिंकली

लंडन : वृत्तसंस्था

विराट कोहलीच्या टीम इंडियाने ब्रिस्टलच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवत तीन सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर 2-1 अशी मात केली. या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 199 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं होतं.

‘हीटमॅन’ रोहित शर्माचे नाबाद अर्धशतक आणि हार्दिक पांड्याची शानदार अष्टपैलू खेळी या जोरावर भारताने तिसऱ्या आणि निर्णायक टी20 सामन्यात इंग्लंडचा 7 गड्यांनी धुव्वा उडवत, तर सलग सहावी मालिका जिंकण्याचाही विक्रम केला.दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा आतापर्यंत कधीही पराभव झाला नाही. हा विक्रम कायम राखत भारताने आठवी मालिका जिंकली.रोहित शर्माने ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या कारकीर्दीतलं तिसरं शतक ठोकून भारताला हा सामना आणि मालिका जिंकून दिली.

[amazon_link asins=’B07DDFLBBF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ede134eb-8333-11e8-b07f-19ee1eafca97′]

रोहित शर्माने तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात नाबाद शतक झळकावत भारताचा विजय साकारला. त्यासोबतच रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावांचा टप्पाही पार केला. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा भारतीय, तर जगातील पाचवा फलंदाज ठरला. रोहितआधी कर्णधार विराट कोहलीने अशी कामगिरी केली आहे.

रोहित शर्माने काल झालेल्या सामन्यात आतंरराष्ट्रीय टी-20 सामन्यातील तिसरे शतक झळकावले. भारतीय संघासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू म्हणून रोहित शर्माची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये कॉलिन मुनरोनंतर तीन शतके झळकावणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू. टी20 मध्ये पाच यष्टीमागे पाच झेल घेणारा धोनी एकमेव खेळाडू बनला आहे. धोनी क्रिकेटविश्वातील एकमेव यष्टीरक्षक ठरला आहे. धोनीने 93 सामन्यांत 54 झेल घेतले आहेत. त्याने दीपक चाहरच्या गोलंदाजीवर जेसन रॉयचा झेल घेत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर हेल्स, इयॉन मोर्गन, बेयरस्टॉ आणि लियाम प्लंकेट यांना झेलबाद केले.

रोहितने 56 चेंडूंत अकरा चौकार आणि पाच षटकारांसह शतक साजरं केलं. विराट कोहलीने 43 आणि हार्दिक पंड्याने नाबाद 33 धावांची खेळी उभारली. रोहित शर्माने या शतकी खेळीसह टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी नवा इतिहास रचला आहे.