‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ पुस्तकावर उदयनराजेंची ‘परखड’ भूमिका

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक वादग्रस्त ठरले असून याच्या विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करण्यात आल्याने भाजपवर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीनंतर मनसेने इशारा दिला आहे. तसेच संभाजी ब्रिगेडने देखील यामध्ये उडी घेतली आहे. या पुस्तकातील मोदींच्या तुलनेवरून आमदार शिवेंद्रराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मनसेचे बाळा नांदगावकर यांनी या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच पुस्तकाचे लेखक सध्या दिल्लीत आहेत, आज नाहीतर उद्या मुंबईत येतीलच असा इशारा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जनतेची माफी मागावी अन्यथा भाजपच्या कर्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच छत्रपती संभाजीराजे आणि शिवेंद्रराजे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची भूमिका काय ? असा प्रश्न विचारला होता. त्यावर, दोन्ही राजांनी आपली भूमिका स्पष्ट करत संजय राऊत यांना उत्तर दिले होते.

वादग्रस्त पुस्तकात मोदी यांची शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना केल्याने वाद उफाळून आला आहे. यावर अद्याप छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी अद्याप आपले मत व्यक्त केले नाही. मंगळवारी उदयनराजे भोसले पुण्यामध्ये आपली परखड भूमिका मांडणार आहेत. उदयनराजे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे उद्या उदयनराजे नेमके काय बोलणार, ते संजय राऊत यांना उत्तर देणारा का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/