‘झेलम’ एक्सप्रेस शुक्रवारी दौंड ऐवजी कल्याण मार्गे जाणार

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दौंड सेक्शनमध्ये रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने उद्या शुक्रवारी सायंकाळी पुण्याहून जम्मू तावीला जाणारी झेलम एक्सप्रेस दौंड, अहमदनगर, भुसावळ ऐवजी पुणे लोणावळा, कर्जत पनवेल, कल्याण, कसारा, इगतपूरी, मनमाड मार्गे जाणार आहे.

पुणे-बिलासपूर एक्सप्रेस, पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस अगोदर रद्द केल्या. पण आता त्या गाड्या त्यांच्या नेहमीच्या वेळेवर धावणार आहेत. दौंड ऐवजी कल्याण मार्गे जाणार असल्याने अनेक प्रवाशांचे हाल होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासुन रेल्वे रद्द होणे तसेच त्यांच्या मार्गामध्ये बदल झाल्यामुळं प्रवाशांचे चांगलेच हाल झालेले आहेत.