Rowing player Dattu Bhokanal | ‘महाराष्ट्रीय असल्यानं माझ्यावर अन्याय झालाय’, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूचा गंभीर आरोप, आता करतोय शेती

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – रोईंग स्पर्धेत (Rowing Game) भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळकर (Rowing player Dattu Bhokanal) याच्यावर आज शेती करण्याची वेळ आली आहे. 2020 मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) प्राप्त दत्तू भोकनळने (Rowing player Dattu Bhokanal) आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. एवढेच नाही तर त्याने फेडरेशनविरुद्ध भेदभावाचे आरोप केले आहेत. महाराष्ट्रीयन असल्याने माझ्यावर अन्याय झाला, असे दत्तू भोकनळने सांगितले.

दत्तू भोकनळ म्हणाला, माझ्यापेक्षा जास्त वेळ घेणाऱ्या खेळाडूंना संधी दिली गेली. मला पात्रता फेरीत भाग घेण्याची परवानगीदेखील नव्हती, पण कोणतेही कारण न सांगता मला शिबिरातून काढून टाकण्यात आले. दत्तू भोकनळ याला 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

दत्तू भोकनळ याची आजवरची कामगिरी
ऑलिम्पिकसाठी (Olympics) तयारी करत असताना अचानक दत्तूला सरावातून डावलण्यात आले. त्यामुळे त्याने सैन्यात नायब सुभेदार पदाचा राजीनामा दिला. 2014 मध्ये दत्तूने राष्ट्रीय रोईंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण पदके जिंकली होती. 2015 मध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये दत्तूने रौप्य पदक आणि त्यानंतर चीनमध्ये झालेल्या 16 व्या आशियाई रोईंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. याच कामगिरीच्या जोरावर त्याला 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. भारताकडून रोईंग स्पर्धेत खेळणारा तो एकमेव खेळाडू होता.

Web Titel :-  arjuna award winning rowing player dattu bhokanal is doing farming now

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट