SAD NEWS : भारतीय क्रिकेट प्लेअरचं अवघ्या 36 व्या वर्षीच कोरोनामुळं निधन

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  भारतात कोरोनाने थैमान घातले असून दैनंदिन बाधितांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण देखील अधिक आहे. यामध्येच भारतीय क्रिकेट प्लेअर आणि आयपीएलचा खेळाडू विवेक यादव यांचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट संघात खळबळ उडाली आहे. त्याचे वय ३६ वर्ष आहे. विवेकला मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्याला कॅन्सर देखील होता.

कोरोनाच्या महामारीमुळे दोन दिवसासापुर्वीच आयपीएल (2021) स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. अनेक खेळाडू कोरोनाच्या जाळ्यात सापडत असल्याने तेथे सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर विवेकच्या मित्रांनी आणि सहकारी क्रिकेटपटूंनी त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केले आहे. आव्हानांचा सामना करण्यास सदैव सज्ज असलेला क्रिकेटपटू असं त्यांनी विवेकचं वर्णन देखील केलं आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनने सुद्धा याबाबत शोक व्यक्त केला आहे. कोरोनामुळे राजस्थान क्रिकेटचे या आठवड्यात झालेलं हे दुसरे नुकसान आहे.

यापूर्वी राजस्थान क्रिकेटमध्ये टायगर या नावावे प्रसिद्ध असलेले किशन रुंगठा (वय, ८९) यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले होते. ते राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य होते. तसेच, राजस्थान रणजी टीमचे माजी कॅप्टन देखील होते. या दरम्यान, विवेक यादव हा २०१२ रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्स (DD) या आयपीएल टीमचा सदस्य होता.