‘या’ कारणामुळं RSS लवकरच BJP साठी ‘प्रचारक’ पाठवणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाचा होत असलेला विस्तार लक्षात घेता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पूर्ण वेळेसाठी प्रचारक मिळू शकतात. भाजपचा असा दावा आहे की त्यांच्या सदस्यांची संख्या जवळपास 18 कोटींच्या जवळपास आहे. अशा परिस्थितीत संघटनात्मक संरचनेचा विस्तार करावा लागू शकतो. 2015 ते 2019 या काळात भाजपाच्या सदस्यतेत मोठी वाढ झाली आहे. असा दावा केला जात आहे की चार वर्षांपूर्वीच्या सदस्यत्व मोहिमेमध्ये 11 कोटी सदस्य असलेला भाजपा हा देश आणि जगातील सर्वात मोठा पक्ष झाला होता.

यावर्षी 20 टक्यांच्या वाढीच्या उद्दीष्टापेक्षा जास्त सदस्य झाले आहेत. अशा परिस्थितीत सर्वांशी अधिक चांगल्या समन्वयासाठी पक्षात मोठ्या प्रमाणात (प्रादेशिक व राज्यस्तरीय) कुशल आयोजकांची गरज आहे. संघातील पूर्णवेळ प्रचारक भाजपमधील संघटना हाताळत असल्याने त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी दिली जाऊ शकते. वेळोवेळी संघ आपले प्रचारक भाजपकडे पाठवितो. अलीकडेच, भाजपामध्ये राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून प्रदीर्घ कार्यकालानंतर रामलाल संघात परतले.

संघातील प्रचारक पक्षात येत असतात, पण कोणत्याही घोषणा केल्या जात नाहीत, असे भाजपचे एक प्रख्यात नेते म्हणाले. नियुक्तींवर मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाते. संघाचे प्रचारक निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहतात आणि ते केवळ संघटनात्मक कामकाजापुरते मर्यादित असतात. भाजपच्या विस्ताराचा विचार करता संघटनात्मक रचनेतही काही बदल अपेक्षित असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्याअंतर्गत संघटनात्मक पदांची संख्या विविध स्तरावर वाढवता येऊ शकते.

आरोग्यनामा ऑनलाइन –

Loading...
You might also like