RTO Office Corruption | 10 हजारांची लाच मागितली अन् तरुणाने RTO अधिकाऱ्याला कपडे दिले काढून

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – RTO Office Corruption | सांगलीमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये आरटीओ कार्यालयामध्ये (RTO Office) भ्रष्टाचार (RTO Office Corruption) किती प्रमाणात चालतो हे दाखवून देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) कडेगाव तालुक्यातील आरटीओ कार्यालयाचा आहे. यामध्ये एका आरटीओ अधिकाऱ्याने गाडी पासिंगसाठी (Car Passing) लाच (Bribe) मागितल्या नंतर सामाजिक कार्यकर्त्याने चक्क आपले कपडे काढून कार्यालयासमोर गांधीगिरी सुरु केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे (Social workers Pramod Mandve) हे वाहन पासिंग करण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी एका आरटीओ अधिकाऱ्याने वाहन पासिंग करण्यासाठी प्रमोद मांडवे या तरुणाकडे दहा हजार रुपयांची लाच (Demanding Bribe) मागितली. यानंतर प्रमोद मांडवे यांनी चक्क आपली कपडे काढून गांधीगिरी पद्धतीने अनोखे आंदोलन केले. (RTO Office Corruption)

मांडवे एवढ्यावरच थांबले नाहीतर, कडेगाव येथे भ्रष्ट RTO अधिकाऱ्यांचा हार घालून सत्कार केला.
यावेळी RPI आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, वंचितचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे,
शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष विजय माळी उपस्थित होते. यानंतर अनेक संघटनांनी एकत्र येऊन
भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

Web Title :- RTO Office Corruption | a bribe of 10 thousand was demanded young man took off his clothes to the rto officer sangali

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | सरकारमध्ये कुणीही नाराज नाही, जर कोणी नाराज असेल तर त्यांची समजूत काढण्याची व्यवस्था सरकारकडे आहे – चंद्रकांत पाटील

Sushma Andhare | हे दादा कोण आहेत, एकनाथ शिंदे यांचे जुळे भाऊ आहेत का? – सुषमा अंधारेंचा मोठा प्रश्न