Rupali Chakankar On BJP MLA Ganesh Naik | ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ प्रकरणी गणेश नाईक यांना अटक होणार, चौकशी करणार – रूपाली चाकणकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Chakankar On BJP MLA Ganesh Naik | ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक (Airoli BJP MLA Ganesh Naik) यांच्या विरोधात नेरुळ (Nerul Police Station) आणि नवी मुंबई पोलीस ठाण्यात (Navi Mumbai Police Station) गुन्हे दाखल आहेत. हे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे त्यांना अटक करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Maharashtra State Women’s Commission President) रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले.

 

चाकणकर म्हणाल्या की, एका महिलेने राज्य महिला आयोगाला ई मेलद्वारे आमदार गणेश नाईक (MLA Ganesh Naik) यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
त्यानंतर संबंधित महिलेने आयोगाकडे प्रत्यक्ष हजर राहत घटनेचा वृतांत सांगितला व तक्रार दाखल केली.
आयोगाने याची गंभीरपणे दखल घेत नवी मुंबई पोलिसांना या प्रकरणाचा तपास करून ४८ तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार दि. १५ रोजी नवी मुंबई पोलीस ठाण्यात आयपीसी ५०६ ब नुसार गणेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तर नेरुळ पोलीस ठाण्यात दि. १६ रोजी IPC ३७६ नुसार गुन्हा दाखल केला.
हे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे नाईक यांना अटक करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अडचणीत वाढ
एका महिलेला धमकी दिल्याच्या कारणावरून सीबीडी पोलीस ठाण्यात आमदार गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर २४ तास होत नाही तोपर्यंत त्याच महिलेने आमदार नाईक यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल केला. त्यामुळे नाईक यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

काय आहे प्रकरण ?
आमदार गणेश नाईक यांनी १९९३ पासून एका महिलेला लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन शोषण केले.
धमकी आणि आमिषामुळे संबंधित महिला नाईक यांच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) राहू लागली.
या संबंधातून त्यांना १५ वर्षाचा मुलगा देखील आहे.
त्यानंतर पीडितेने लग्नाची मागणी तसेच मुलाला पितृत्वाचा अधिकार मागितल्याच्या कारणावरून नाईक यांनी जीवे मारण्याची धमकी दिली.
नाईक यांचा मुलगा संदीप नाईक (Sandeep Ganesh Naik) हा जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे संबंधित महिलेने राज्य महिला आयोगाला दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

 

Web Title :- Rupali Chakankar On BJP MLA Ganesh Naik | live in relationship case Airoli BJP MLA Ganesh Naik will be arrested and interrogated says Maharashtra State Women’s Commission President rupali chakankar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा