S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघ बाद फेरीत; माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा सलग दुसरा विजय !!

पुणे : S. Balan Cup T20 League | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ (S. Balan Cup T20 League) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने (Punit Balan Group Team) सलग तिसरा विजय मिळवत स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. माणिकचंद ऑक्सिरीच संघाने (Manikchand Oxirich Team) सलग दुसरा विजय नोंदविला. (S. Balan Cup T20 League)

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर (Shinde High School Ground, Sahakarnagar) सुरू असलेल्या या स्पर्धेत डावखुरा जलदगती गोलंदाज सचिन भोसले याच्या भेदक गोलंदाजी आणि हॅट्रीक कामगिरीच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने पुणे पोलिस संघाचा सहज पराभव करून क गटातून बाद फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. सचिन भोसले याच्या गोलंदाजीचा तडाखा येवढा होता की, त्याने ४ पैकी २ षटके निर्धाव टाकली आणि केवळ ७ धावा देऊन हॅट्रीकसह ४ गडी बाद केले. दुसर्‍या बाजूने धीरज फटांगरे यानेही ११ धावात ३ गडी टिपले. पुणे पोलिस संघाचा डाव २४ धावांवर गडगडला. यश डी. हा एकमेव फलंदाज दोन अंकी धावसंख्या गाठू शकला. सचिन भोसले याने नाबाद २१ धावा करून पुनित बालन ग्रुप संघाला २.१ षटकामध्ये सहज विजय मिळवून दिला.

हर्ष संघवी याच्या ६७ धावांच्या जोरावर माणिकचंद ऑक्सिरीच संघाने अष्टपैलू स्पोर्ट्स फाऊंडेशनचा ५० धावांनी सहज पराभव करत
स्पर्धेत सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना माणिकचंद ऑक्सिरीचने १८५ धावा धावफलकावर लावल्या.
हर्ष संघवी याने ३२ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ६७ धावांची खेळी केली. दिलीप मालविया (४२ धावा) आणि हर्ष ओस्वाल (३६ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. या आव्हानासमोर अष्टपैलू स्पोर्ट्स फाऊंडेशनचा डाव १३५ धावांवर मर्यादित राहीला. माणिकचंद ऑक्सिरीच संघाचे गोलंदाज रोहन फंड (३-२०), अक्षय जाधव (२-१५) आणि निखील भोगले (२-१७) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला. (S. Balan Cup T20 League)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पुणे पोलिसः ७.५ षटकात १० गडी बाद २४ धावा (यश डी. १२, सचिन भोसले ४-७, धीरज फटांगरे ३-११) पराभूत वि. पुनित बालन ग्रुपः २.१
षटकात बिनबाद २५ (सचिन भोसले नाबाद २१); सामनावीरः सचिन भोसले;

माणिकचंद ऑक्सिरीचः २० षटकात ९ गडी बाद १८५ धावा (हर्ष संघवी ६७ (३२, ६ चौकार, ५ षटकार), दिलीप मालविया ४२, हर्ष ओस्वाल ३६,
पवन आनंद २-४४, प्रफुल्ल मानकर २-३४) वि.वि. अष्टपैलू स्पोर्ट्स फाऊंडेशनः १७.५ षटकात १० गडी बाद १३५ धावा (सौरभ संकलेचा ४५,
सागर जाधव २३, रोहन फंड ३-२०, अक्षय जाधव २-१५, निखील भोगले २-१७); सामनावीरः हर्ष संघवी;

Web Title :- S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket Tournament; Punit Balan Group Team In Knockout Round; Manikchand Oxyrich team’s second win in a row !!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Imtiaz jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, इम्तियाज जलील यांनी राम मंदिरातून केलं शांत राहण्याचं आव्हान (व्हिडिओ)

NCP MLA Amol Mitkari | ‘अन् तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे…’, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

Pune Crime News | मुंढव्यात 16 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करून बलात्कार, 20 वर्षीय युवकास अटक