home page top 1

पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या सहाय्यक सरकारी वकिलाचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काही कामानिमित्त पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या सहाय्यक सरकारी वकिल पापा गवळी उर्फ एस.जी. गवळी यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

पापा गवळी हे शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी वकिल म्हणून गेल्या ३ वर्षापासुन कार्यरत होते. अत्यंत मनमिळावू असलेल्या पापा गवळी यांचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याने त्यांच्या निकटवर्तीयांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जवळयाच्या मित्रांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. मंगळवारी दुपारी त्यांना अचानकपणे ह्दयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले आहे. सुरेश गणेश गवळी असे त्यांचे पूर्ण नाव होते. ते खडकी येथील १३५, जूना बाजार येथे रहावयास होते.

Loading...
You might also like